Tamilnadu Vidhan Sabha Election: तामिळनाडूमध्ये स्टॅलिन पुन्हा जादू दाखवणार की ‘विजय’ची वेळ येणार? कोण गाठणार बहुमताचा आकडा?
Tamilnadu Vidhan Sabha Election: मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पाचही राज्यांमध्ये व केंद्रशासित प्रदेशात कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

Tamilnadu Vidhan Sabha Election: देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे (२०२६) निकाल आज, ४ मे २०२६ रोजी जाहीर होत आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पाचही राज्यांमध्ये व केंद्रशासित प्रदेशात कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रांच्या बाहेर निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे.
तामिळनाडू विधानसभेच्या २३४ जागांसाठी २३ एप्रिल रोजी मतदान झाले असून बहुमताचा ११८ हा आकडा गाठण्यात कोण यशस्वी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक मतदानोत्तर चाचण्यांनी विद्यमान सत्ताधारी अर्थात स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) पुन्हा सत्तेत बसेल, असा अंदाज वर्तवला आहे. अण्णा द्रमुकला यावेळीही विरोधातच बसावे, लागण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे.
तर दुसरीकडे सिनेविश्वातील लोकप्रिय चेहरा असलेला अभिनेता थलपती विजय यांचा टीव्हीके पक्ष देखील निवडणुकीच्या रिंगणात होता. त्यामुळे याच्या पक्षाला किती जागा मिळतात, यावर तामिळनाडू सत्तेची गणिते अवलंबून असणार आहेत. २३४ जागांपैकी थलपती विजय यांच्या पक्षाला ९० ते १०० जागा मिळू शकतात, असे मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज आहेत. डीएमके दुसऱ्यांदा विजय मिळवणार की थलापथी विजय चमक दाखवणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
एक्झिट पोल-
पिपल्स पल्स आणि मॅट्रिझच्या एक्झिट पोलनुसार, डीएमके-काँग्रेस- १२५ ते १४५ जागा आणि अण्णा द्रमुक-भाजप- ७० ते १०० जागा. तर अॅक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार, थलपती विजयच्या पक्षाला ९८ ते १२० जागा मिळतील असा अंदाज आहे.
दरम्यान, तमिळनाडूमध्ये सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी मतमोजणी केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. चेन्नईच्या लोयोला कॉलेज मतमोजणी केंद्राचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जिथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा:





