Shatrughan Sinha : सोनाक्षी राजकारणात प्रवेश करणार? वडील शत्रुघ्न सिन्हा स्पष्टचं म्हणाले…
Shatrughan Sinha : याच पार्श्वभूमीवर तिचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते-राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांनी एका न्यूज चॅनेलसोबत संवाद साधला.

Shatrughan Sinha : बॅालिवूडमधील अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अनेकदा सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्टपणे मांडताना दिसते. सीजेपीच्या आंदोलनाला तिने पाठिंबा दर्शवला होता. त्यावेळी तिची भूमिका सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली होती. मात्र, झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर सोनाक्षीने मौन बाळगल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
याच पार्श्वभूमीवर तिचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते-राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांनी एका न्यूज चॅनेलसोबत संवाद साधला. यावेळी सोनाक्षी आगामी काळात राजकारणात प्रवेश करणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी महत्वाचा खुलासा केला आहे.
सोनाक्षी राजकारणात येणार का?
मुलीच्या राजकीय भूमिकेबाबत आणि ती भविष्यात राजकारणात प्रवेश करणार का, या प्रश्नावर उत्तर देताना शत्रुघ्न सिन्हा यांनी एक सूचक वक्तव्य केले. “मी सांगू शकत नाही. मी आधी तिलाच विचारायचो.” पुढे ते म्हणाले, “मी एवढेच म्हणू शकतो की ती एका अत्यंत योग्य वडिलांची अत्यंत योग्य मुलगी आहे.”
सोनाक्षीच्या ट्रोलिंगवर शत्रुघ्न सिन्हा संतापले
दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा यांच्या वक्तव्यानंतर सोनाक्षी भविष्यात राजकारणात प्रवेश करणार का, याबाबत चर्चा रंगू लागली आहे. सोनाक्षी विरोधातील ट्रोलिंगवर शत्रुघ्न सिन्हा यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले “सोनाक्षीविरोधात ट्रोलिंग घडवून आणले जात आहे. हे ट्रोलर्स काय बोलावे याचेही भान न ठेवता प्रतिक्रिया देतात. सोनाक्षी मात्र या ट्रोलिंगकडे फारसे लक्ष देत नाही.”
सोनाक्षी सध्या काय करतेय?
सोनाक्षी सिन्हा अलीकडेच ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘सिस्टम’ या कोर्ट रुम ड्रामा वेबसिरीजमध्ये दिसली होती. या प्रोजेक्टमध्ये तिने वकिलाची भूमिका साकारली होती. तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.






