Bigg Boss 20 : ‘बिग बॉस २०’मध्ये शिवांगी जोशी सहभागी होणार? पोस्टद्वारे सांगितले सत्य
Bigg Boss 20 : अभिनेत्री शिवांगी जोशीच्या नावाचीही चर्चा

Bigg Boss 20 : अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेला ‘बिग बॉस २०’ या शोची चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. हा शो लवकरच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत असून, या शोसाठी अनेक स्पर्धकांची नावेही समोर येत आहेत. यामध्ये टीव्ही अभिनेत्री शिवांगी जोशी हिच्या नावाचीही चर्चा होत आहे. मात्र याबाबत स्वत: शिवांगीने पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे.
शिवांगी जोशीने ‘बिग बॉस २०’ मध्ये सहभागी होण्याच्या बातम्यांवर प्रतिक्रिया देत त्या पूर्णपणे चुकीच्या असल्याचे सांगितले आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लिहिले, “मला समजले आहे की सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मी ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होत असल्याचा चुकीचा दावा केला जात आहे. मला स्पष्ट करायचे आहे की मी ‘बिग बॉस २०’ मध्ये भाग घेत नाहीये आणि तो व्हिडिओ पूर्णपणे बनावट आहे.”
नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये शिवांगी जोशी ‘बिग बॉस २०’ ची कन्फर्म स्पर्धक असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, आता अभिनेत्रीने या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत. तिने सविस्तर पोस्ट शेअर करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. Bigg Boss 20
शिवांगी जोशी अलिकडेच ‘लॉकअप २’मुळे चर्चेत होती. या शोमध्ये तिने वैयक्तिक आयुष्यातील अनेक धक्कादायक खुलासा केले. लहानपणी तिच्या काकांनीच तिला दिलेला त्रास ते बिकट आर्थिक परिस्थिती अशा सगळ्याबद्दल तिने शोमध्ये सांगितलं होतं. शिवांगी शोमध्ये फिनालेपर्यंत पोहोचली होती, मात्र श्रेया कालराने बाजी मारली. Bigg Boss 20
हेही वाचा:






