बिग बॉस 16 जिंकण्याचं शिव ठाकरेचं स्वप्न राहणार अधुरं? वाचा नेमकं कारण काय….

मुंबई – 100 दिवस, 17 सदस्य आणि एक ट्रॉफी! ‘बिग बॉस’च्या घरामध्ये आलेला प्रत्येक सदस्य जिंकण्याचे ध्येय घेऊन घरात आला आहे. सदस्य आणि प्रेक्षक सगळ्यांनाच माहिती आहे की? विजेता कोणी एकच असणार आहे. प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांची मने जिंकायला पहिल्या भागापासूनच सुरुवात केली. सध्या देशाच्या प्रत्येक घरात आणि कानाकोपरामध्ये फक्त बिग बॉस 16 ची चर्चा रंगत गेली.
मग ती टास्कविषयी असो, घरात होणार्या राड्यांविषयी असो वा सदस्यांच्या दिवसागणिक बदलणार्या नात्यांविषयीची असो. मराठमोळा शिव ठाकरे या यादीत नंबर वन आहे का? असा प्रश्नही त्याच्या चाहत्यांना पडला. तर याचे उत्तर आले आहे. सध्या शिव ठाकरे आणि एमसी स्टॅनला मागे टाकले प्रियंका चाहर चौधरीने प्रथम क्रमांकावर आली आहे.
एमसी स्टॅन गेल्या दोन आठवड्यांपासून पहिल्या क्रमांकावर होता, तर या आठवड्यात प्रियंकाने बाजी मारली. गेल्या आठवड्यात प्रियंकाची अनेकांसोबत भांडणं झाली या सगळ्यांमुळे ती कायम चर्चेत होती. त्यामुळे या आठवड्यात प्रियंका लोकप्रिय स्पर्धकांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर, दुसरीकडे शिव ठाकरे तिसऱ्या क्रमांकांवर असल्याचं दिसून येत आहे. ऑरमॅक्स मीडियाकडून या आठवड्याची यादी जाहीर करण्यात आली आहे.





