Sushma Andhare : सोशल मीडियावर शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत शिरसाट हॅाटेलमध्ये बसले असून त्यांच्या बॅगेत पैसे असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी चहूबांजीनी शिरसाट यांच्यावर टीका केली जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तो व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडीओवरून राजकारण चांगलेच तापले असून उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत शिरसाट यांच्याकडे कॅश आढळून आल्याची पहिलची घटना नसून याअगोदरही शिंदेंच्या शिवसेनेतील आणि भाजप नेत्यांकडे कधीकधी पैसे सापडले आहेत, याचा इतिहास सांगितला आहे. शिरसाटांकडून आरोपांचे खंडन सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून शिरसाट यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. व्हिडीओ मार्फ करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. याचे स्पष्टीकरण देताना शिरसाटांनी माझचं घर आहे. माझीच बॅग आहे आणि व्हिडीओ माझ्या जवळच्या माणसाने काढलाय पण कोणी काढलाय हे माहीत नाही असे म्हटले आहे. त्यांच्या या विधानावर सुषमा अंधारेंनी एवढा पैसा कमावणाऱ्या माणसाला एक विश्वासू माणूस कमावता येत नसेल तर त्याचे जगणे व्यर्थ आहे, असा टोला लगावला आहे. संजय राऊतांची मागणी संजय राऊत यांनी शिरसाटांवर या प्रकरणावरून गंभीर स्वरुपाचे आरोप करत आहेत. अशातच आता त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील पाच मंत्र्यांची एसआयटी चौकशी किंवा न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणी केली आहे. संजय राठोड, संदिपान भुमरे, संजय शिरसाट, उदय सामंत यांच्यासह पाच जणांची नावे आहेत, असे राऊत म्हणाले आहे. संजय शिरसाट अब्रुनुकसानीचा दावा करणार आहेत. या प्रश्नावर राऊत म्हणाले की, तो व्हिडीओ मार्फ केला की काय केले, ते फॉरेन्सिक लॅब ठरवणार आहे. त्यासंदर्भात विधानसभेत वक्तव्य येऊ द्या. सुषमा अंधारेंच्या पोस्टमधील कॅश सापडलेल्या घटना – 20 नोव्हेंबर 2023 ला भाजपाचे तात्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊमध्ये कसीनो मध्ये पैशांची लय लूट करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. – 22 ऑक्टोबर 2024 ला पुण्याजवळच्या शिरवळ येथील टोल नाक्यावर शहाजी बापू पाटील यांच्या निकटवर्तीयाच्या गाडीमध्ये पाच कोटीची रक्कम सापडली. _ 19 नोव्हेंबर 2024 ला विरारच्या विवांता हॉटेलमध्ये भाजपाचे नेते विनोद तावडे हे पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ बहुजन विकास आघाडीने प्रकाशित केला. –28 मे 2025 ला अर्जुन खोतकर यांच्या पीए कडे धुळ्यामध्ये साडेपाच कोटींची कॅश सापडली. –नाशिक येथे शिक्षक मतदार संघाचे एसंशी चे उमेदवार किशोर दराडे यांच्याकडून कॅश आणि इतर वस्तू वाटप करताना चे व्हिडिओ व्हायरल झाले. हेही वाचा : संजय राऊत विरुद्ध संजय शिरसाट! राऊतांना अब्रुनुकसानीची नोटीस देणार असल्याचा इशारा