संजय राऊत विरुद्ध संजय शिरसाट! राऊतांना अब्रुनुकसानीची नोटीस देणार असल्याचा इशारा

Sanjay Raut vs Sanjay Shirsat | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र राऊत यांनी प्रसारित केलेला तो व्हिडीओ मॉर्फ असल्याचा दावा शिरसाट यांनी केला.
यानंतर आता संजय राऊत विरूद्ध संजय शिरसाट वाद समोर आला आहे. संजय राऊत यांना अब्रुनुकसानीची नोटीस बजावण्यात येईल. त्यांनी माफी न मागितल्यास पोलिसांत तक्रार देणार असल्याचा इशारा समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी दिला.
…तर विरोधकांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ
जिल्हाधिकारी कार्यालय येथे एका बैठकीनिमित्ताने शिरसाट आले असता पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले. “विरोधक मला टार्गेट करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्या विरोधात खूप पुरावे आहेत, पण आता ते बाहेर काढण्याची इच्छा नाही. पण गरळ ओकली तर विरोधकांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ. राऊत यांना अब्रुनुकसानीची नोटीस बजवणार असून, त्यांनी उत्तर दिले नाही, माफी मागितली नाही तर फौजदारी गुन्हाही दाखल करू’ असा इशाराही शिरसाट यांनी दिला.
तसेच ‘बदनामी करण्यासाठी किती खालच्या पातळीवर उतरू शकतो, हे राजकारणात पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. राजकीय नीतिमत्ता नसलेल्या अशा लोकांना धडा शिकविला पाहिजे,’ असेही शिरसाट म्हणाले. Sanjay Raut vs Sanjay Shirsat |
संजय राऊत यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्या बेडरूममधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओत बाजूला एक बॅग पडलेली दिसत आहे, ज्यात नोटांचे बंडल असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. मात्र हे आरोप शिरसाट यांनी फेटाळले आहे. यानंतर आता संजय शिरसाट विरुद्ध संजय राऊत हा वाद कोर्टात जाणार असल्याचे दिसत आहे. Sanjay Raut vs Sanjay Shirsat |
हेही वाचा :
“उत्तर कोरियाला लक्ष्य केले तर…” ; रशियाचा अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाला इशारा





