Ram Charan | काल दि. २६ मार्च रोजी दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांच्या बहुप्रतिक्षित पेड्डीचा फर्स्ट लूक या चित्रपटाच्या निर्मात्यांनी रिलीज केला आहे. राम चरण याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत या चित्रपटाचे टायटलही जाहीर करण्यात आले आहे. रिलीज करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये राम चरणचा ढांसू लूकवर चर्चेला केली जात असून या लूकला अल्लू अर्जूनच्या पुष्पा लूकसोबत तुलना केली जात आहे. रिलीज करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये राण चरण तोंडात विडी घेऊन ‘पुष्पा’सारखा दिसत आहे. या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक समोर आल्यानंतर चाहत्यांची या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे. अभिनेता राम चरण याचा आज 40 वा वाढदिवस आहे. त्याला वाढदिवसाची भेट म्हणून चित्रपटाच्या निर्मात्याने सिनेमाचे टायटल आणि त्याचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. अभिनेत्याचा हा लूक ‘पुष्पा’मधील अल्लू अर्जुनच्या लूकसारखा आहे. त्याचे तीक्ष्ण डोळे, गोंधळलेले केस, अस्पष्ट दाढी आणि नाकातील अंगठी त्याला तीव्र अवतारात दाखवत आहेत. आणखी एका पोस्टरमध्ये त्याच्याकडे जुनी क्रिकेट बॅट असल्याचे दिसून आले आहे. पार्श्वभूमीत फ्लडलाइट्सने उजळलेले गावातील स्टेडियम आहे. या पोस्टवरून सिनेमाची कथा ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारलेले असू शकते. या चित्रपटाचे बजेट मोठे असून मोठ्या स्केलवर चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर, शिव राजकुमार, जगपती बाबू आणि दिव्येंदू शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन बुची बाबू सना यांनी केले आहे. विशेष बाब म्हणजे कन्नड मेगास्टार शिवा राजकुमारची या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान यांनी संगीताची जबाबदारी घेतली आहे.