“कौन’च्या रिमेकमध्ये काम करणार नाही; मनोज वाजपेयी

मनोज वाजपेयीने अनेक संस्मरणीय सिनेमांमधून काम केले आहे. त्यामधीलच एक सिनेमा आहे “कौन’. हा सिनेमा 1999 साली बनला होता आणि या सस्पेन्स थ्रिलर सिनेमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.
आता जर “कौन’चा रिमेक बनवला गेला तर आपण या सिनेमात काम करणार नाही, असे मनोज वाजपेयीने म्हटले आहे. 22 वर्षांपूर्वी जेंव्हा हा सिनेमा बनवला गेला होता, तेंव्हा प्रेक्षक अगदी मंत्रमुग्ध झाले होते. अजूनही “कौन’ची चर्चा होत असते.
मात्र पुन्हा त्याच सिनेमामध्ये काम केले जाऊ शकत नाही. त्याच त्या कथेवर पुन्हा पुन्हा काम करण्यात काहीही अर्थ नाही. जर चांगले काम करायचे झाले तर एखाद्या नवीन कथेवरच्या नव्या सिनेमात काम करायला आपल्याला आवडेल, असे मनोज म्हणाला.
पूर्वीची भूमिका पुन्हा साकारण्यापेक्षा नवीन भूमिकेला नव्या ढंगात साकारण्यात आनंद असेल असे वाटल्यानेच आपण “कौन’त्या रिमेकमध्ये काम करणार नाही, असे तो म्हणाला.
अजून तरी “कौन’चा रिमेक बनवण्याची कोणतीही चर्चा नाही. मनोज वाजपेयीचा “डायल 100’चा प्रिमियर याच महिन्यात ओटीटीवर झाला आहे.





