Sandeep Deshpande : मुंबईतील मासळी बाजारात मासे न कापता तसेच विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मासे कापल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते आणि अस्वच्छता निर्माण होते, असे कारण हा निर्णय घेण्यामागे देण्यात आले आहे. या निर्णयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने निषेध नोंदवत तीव्र शब्दांत टीका केली आहे. आता मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार संदीप देशपांडे यांनी या निर्णयावर बोट ठेवले असून, मुंबईतील मच्छीमार आत्ता जिलबी- फाफडा विकणार का? असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. नेमकं काय म्हणाले संदीप देशपांडे? (Sandeep Deshpande) “मु्ंबईतील कोळी बांधव मासे विकणार नाही तर काय जिलेबी आणि फाफडा विकणार का असं झालं तर आम्ही आयुक्तांच्या तोंडात जिलेबी आणि फाफडा भरवू. आयुष्यभर त्यांनी तेच खावं. मुंबईत ज्यांना माशांचा वास सहन होत नाही, ज्यांना मासे खायचे नाहीत. त्यांनी गुजरातला जावं. इथे राहायची त्यांची गरज नाही. इथे राहायचे असेल तर मराठी माणसाप्रमाणे राहायला लागेल. तुमचे दादागिरी इथे चालणार नाही, अशा कडक शब्दांत इशारा दिला आहे. नेमका काय निर्णय घेण्यात आला आहे? मुंबई महानगरपालिकेने मासळी बाजारात मासे कापण्यावर बंदी घातली आहे. मुंबईतील वाकोला (धोबीघाट) येथील मासळी बाजारात मासे कापण्यावर आणि मासे स्वच्छ करण्यावर मुंबई महानगरपालिकेकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. (Sandeep Deshpande) हा निर्णय घेण्यामागे प्रशासनाने मासे कापल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते आणि अस्वच्छता निर्माण होते, असे कारण दिले आहे. याशिवाय कोळी महिलांना आता बाजारात मासे कापून न देता, केवळ अख्खे मासे विकण्याची सक्ती केली आहे. या आदेशाचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा देखील देण्यात आला आहे. ठाकरे गटाकडून थेट आव्हान ( Sandeep Deshpande) आमचं त्या सत्ताधाऱ्यांना खुलं आव्हान आहे, आमचे कोळी बांधव मुंबईत मासे विकणार… तुमच्या नाकावर टिच्चून आणि वर्षानुवर्षे ज्या पद्धतीने विकत आलेत त्याच पद्धतीने विकणार… मुंबई महापालिकेने कोळी बांधवांवर कारवाई करुन दाखवावीच. आम्हीही पाहून घेऊ कि मुंबईच्या खऱ्या मानकरींना कोण डिवचतं ते, असा थेट इशारा ठाकरे गटाने दिला आहे. हेही वाचा : PM Modi On Operation Sindoor: ‘दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या अन् पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध…’ ; ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधानांचा पाकला इशारा