PM Modi On Operation Sindoor: ‘दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या अन् पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध…’ ; ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधानांचा पाकला इशारा
PM Modi On Operation Sindoor: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त देशाच्या सशस्त्र दलांच्या शौर्याचे स्मरण केले आणि त्यांना सलाम केला.

PM Modi On Operation Sindoor: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त देशाच्या सशस्त्र दलांच्या शौर्याचे स्मरण केले आणि त्यांना सलाम केला. त्यांनी सोशल मीडिया वर एक पोस्ट करत पाकिस्तानला इशारा दिला आहे. Operation Sindoor
पंतप्रधानांनी आपल्या पोस्टमध्ये, एका वर्षापूर्वी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) दरम्यान विलक्षण शौर्य, अचूक नियोजन आणि दृढनिश्चय दाखवला. पहलगाममध्ये निष्पाप भारतीयांवर हल्ला करण्याचे धाडस करणाऱ्यांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली होती.” असे म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की, संपूर्ण देश आपल्या सैनिकांच्या शौर्याला आणि समर्पणाला सलाम करतो. ते म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरने हे दाखवून दिले आहे की भारताचे दहशतवादाविरोधात कठोर आणि स्पष्ट धोरण आहे आणि राष्ट्रीय सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
A year ago, during #OperationSindoor, our armed forces showcased their valour and gave a firm response to those who attacked our people. Every Indian is proud of our armed forces. As a mark of respect to our forces and their success during #OperationSindoor, let us all change our… pic.twitter.com/w4A3j1bGTw
— Narendra Modi (@narendramodi) May 7, 2026
भारतीय सशस्त्र दलांची व्यावसायिक क्षमता (PM Modi On Operation Sindoor)
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये, “या ऑपरेशनने जगाला भारतीय सशस्त्र दलांची व्यावसायिक क्षमता, जलद कारवाईसाठीची सज्जता आणि परस्पर समन्वय दाखवून दिला.” ते पुढे म्हणाले की,”या ऑपरेशनमध्ये सशस्त्र दलांच्या तिन्ही शाखांमधील उत्कृष्ट समन्वय आणि एकता स्पष्टपणे दिसून आली.”
पंतप्रधानांनी संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भर भारत अभियानाचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, देशांतर्गत संरक्षण उत्पादन मजबूत करण्याच्या आणि स्वदेशी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांमुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला नवी चालना मिळाली आहे.
त्यांनी पुढे असेही सांगितले की, एक वर्ष उलटून गेल्यानंतरही भारत दहशतवादाचे संपूर्ण निर्मूलन करण्यासाठी दृढपणे कटिबद्ध आहे. त्यांनी असेही सांगितले की, दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या किंवा पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरूच राहील. PM Modi On Operation Sindoor





