“मनोज जरांगे आरक्षणाबद्दल राहुल गांधींना प्रश्न विचारणार का?”; प्रसाद लाड यांचा सवाल

Prasad Lad Vs Manoj Jarange | काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर अनेकांकडून टीका केली जात आहे. यातच आता भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी राहुल गांधींच्या विधानावरून मनोज जरांगे पाटील यांना आव्हान दिले आहे. मनोज जरांगे पाटील हे राहुल गांधी यांना आरक्षणाबद्दल प्रश्न विचारणार का? असा सवाल प्रसाद लाड यांनी केला आहे. याशिवाय राहुल गांधी यांच्यावर देखील लाड यांनी निशाणा साधला आहे.
प्रसाद लाड यांनी एक व्हिडिओ शेअर करत मनोज जरांगे यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. यात त्यांनी म्हंटले की, “आरक्षणाबाबत राहुल गांधींची विदेशात जी भूमिका आहे की, संविधान आम्ही संपवणार. ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीत नरेटिव्ह सेट करण्याचे काम केले. आज खऱ्या अर्थाने काँग्रेसची भूमिका राहुल गांधीजींच्या तोंडून स्पष्टपणे, देशासमोर आणि जगासमोर आली”, असे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. Prasad Lad Vs Manoj Jarange |
मनोज जरांगे पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाबद्दल राहुल गांधींना प्रश्न विचारणार का?
राहुल गांधी येणाऱ्या काळात आरक्षण संपवणार असतील, तर मनोज जरांगे पाटील हे म्हणतील का? की राहुल गांधी देखील मा. देवेंद्र फडणवीस जींचा माणूस आहे?
लोकसभा निवडणुकीत नरेटिव्ह सेट करणाऱ्या काँग्रेसची खरी… pic.twitter.com/kNYHKIxhXS
— Prasad Lad (@PrasadLadInd) September 12, 2024
“मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींना विचारणार आहेत का? महाविकास आघाडीचा बुरखा फाडणार आहेत का? राहुल गांधी येणाऱ्या काळात आरक्षण संपवणार असतील, तर मनोज जरांगे पाटील हे म्हणतील का? की राहुल गांधी देखील मा. देवेंद्र फडणवीस यांचा माणूस आहे?,” असे सवाल आमदार लाड यांनी जरांगे यांना केले आहेत. Prasad Lad Vs Manoj Jarange |
याच मुद्द्यावर पुढे बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, “जर आरक्षण रद्द झाले, तर ज्या आरक्षणासाठी भाजप आणि महायुतीने संघर्ष केला. मराठ्यांना आरक्षण दिले. तेच आरक्षण जर राहुल गांधी संपवणार असतील, तर मनोज जरांगे पाटील राहुल गांधींच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार आहेत का?”
दरम्यान, राहुल गांधींनी आरक्षण संपवण्याची भूमिका घेतल्याचे म्हणत भाजपने काँग्रेसला लक्ष्य केले आहे. यावरून प्रसाद लाडांनी मनोज जरांगेंना आव्हान दिले आहे. यावर आता मनोज जरांगे कोणती भूमिका स्पष्ट करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा:
शिंदे गटाकडून मुस्लिम महिलांना बुरखा वाटप; विरोधकांकडून टीका म्हणाले,’संधी साधू राजकारण..’





