राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी किशोर मासाळ यांना संधी मिळणार? अजित पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष

बारामती – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचा युवक प्रदेशचा चेहरा कोण असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. युवक उपाध्यक्ष किशोर मासाळ यांनी याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली असून अजित पवार यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोशल मीडियात किशोर मासाळ यांच्या नावाने पोस्ट केल्या जात आहेत. गेले सात आठ वर्षापासून उपाध्यक्ष पदावर कार्यरत असलेल्या किशोर मासाळ यांच्याकडे युवक प्रदेशाध्यक्षाची धुरा अजित पवार सोपवणार का याकडे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण यांना मारहाण प्रकरणी निलंबित केल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाचा प्रदेशाध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार याची जोरदार चर्चा सोशल मीडियामध्ये सुरू आहे. यामध्येच बारामती मधील किशोर मासाळ यांच्या नावाची जोरदार चर्चा समाज माध्यमांवर वेगवेगळ्या पोस्टच्या स्वरूपात वायरल होताना दिसत आहे.
किशोर मासाळ यांनी प्रदेश उपाध्यक्षपदी अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. तत्कालीन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या चौंडी येथील कार्यक्रमांमध्ये धनगर आरक्षण विषयी निदर्शने केल्यानंतर त्यांना तुरुंगात देखील जावे लागले. राष्ट्रवादीत आल्यानंतर किशोर मासाळ यांनी एक आक्रमक चेहरा म्हणून आपली छाप सोडली आहे. युवकांचे संघटन कौशल्य त्यांच्याकडे आहे. त्यामुळे राज्यभरातून त्यांच्या अध्यक्ष पदाबाबत सोशल मीडियामध्ये पोस्ट केले जात आहेत. कार्यकर्ते भावना व्यक्त करत आहेत.
खरंतर किशोर मासाळ हे माजी युवक अध्यक्ष संग्राम कोते, मेहबूब शेख व सुरज चव्हाण या तीनही प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून त्यांनी आजपर्यंत काम पाहिले आहे, गेल्या आठ वर्षाच्या प्रवेशानंतरच्या कालावधीत त्यांनी वेगवेगळी केलेली आंदोलने ही लक्षवेधी ठरली आहेत, त्यांचे संघटनात्मक कौशल्य समाज माध्यमांवरील व प्रशासनावरील पकड यामुळे त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे युवक प्रदेशाध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाला जोर लावला जात आहे. किशोर मासाळ बारामतीचे रहिवासी आहेत, असे असले तरी देखील त्यांचे संघटन राज्यभर आहे. मासाळ यांनी अजित पवार यांच्याकडे याबाबत मागणी केली असून उपमुख्यमंत्री अजित पवार मासाळ यांना संधी देणार का याकडे लक्ष लागले आहे.





