बिआरित्झ: पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये होणाऱ्या जी-7 देशांच्या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. यावेळी मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता असून, या चर्चेमध्ये काश्मीरचा विषय निघू शकतो. जी-7 देशांमध्ये फ्रान्स, जर्मनी, इटली, अमेरिका, कॅनडा आणि जपान यांचा समावेश आहे. जगातील सात धनाढ्य देशांच्या या परिषदेत भारत हा विशेष निमंत्रित सदस्य आहे.
जागतिक अर्थव्यस्थेत आलेली मंदी आणि व्यापार युद्धाबाबत वाढत असलेली चिंता या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्यामुळे बिआरित्झ येथे जेव्हा जी-7 परिषदेच्या मंचावर विविध देशांचे नेते एकत्र येतील तेव्हा त्यांच्याकडून व्यापार युद्धाबाबत सकारात्मक निर्णयाची अपेक्षा जगाला असेल.