Inflation: फेब्रुवारी 28 पासून खनिज तेलाचे दर 100 डॉलर प्रति पिंपापेक्षा जास्त आहेत. जर दीर्घकाळ खनिज तेलाचे दर याच पातळीवर राहिले तर भारतातील किरकोळ किमतीवर आधारित महागाई वाढून 6% च्या पुढे जाण्याचा धोका संभवतो. अशा अवस्थेत महागाई कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेला व्याजदरात वाढ करण्याच्या शक्यतेवर विचार करावा लागेल असे एचएसबीसी या ब्रोकरेज संस्थेने म्हटले आहे. जर खनिज तेलाचे दर 100 डॉलरच्या खाली आले तर मात्र भारतातील किरकोळ किमतीवर आधारित मागायचा जर 6% पेक्षा कमी राहील. अशा अवस्थेत रिझर्व्ह बँक एकूण परिस्थितीची विचार करून व्याजदर वाढविणे टाळू शकते. मात्र जर उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे सहा टक्क्यांच्या पुढे महागाई गेली तर रिझर्व्ह बँकेला व्याजदरात वाढ करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. हेही वाचा – भारताच्या परकीय चलन साठ्यात 10 अब्ज डॉलरची घट; खनिज तेलाच्या भडकलेल्या दरांचा अर्थव्यवस्थेला फटका भारत जे खनिज तेल खरेदी करतो त्या खनिज तेलाचा दर पूर्ण मार्च महिन्यात 100 डॉलरपेक्षा जास्त होता. त्याचबरोबर जागतिक बाजारात खनिज तेलाचा तुटवडा असल्या मुळे खनिज तेल खरेदी करताना जाहीर दरावर बर्याच प्रमाणात प्रीमियम द्यावे लागते. भारताचे खनिज तेलावरील परावलंबित्व पाहता भारताला या कालावधीत बरेच परकीय चलन खर्च करावे लागले आहे. त्यामुळे भारताच्या परकीय चलन साठ्यावर नकारात्मक परिणाम झाला आहे,या बाबीकडे या अहवालात लक्ष वेधण्यात आले. सध्या तरी परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. मात्र युद्ध लवकर थांबले नाही तर मात्र वित्तीय आणि चलन आघाडीवर गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. महागाई वाढूनही जर व्याजदर वाढ केली नाही तर दीर्घ पातळीवर महागाई कायम राहण्याचा धोका संभवतो. असा प्रकार करोनावेळी झाला होता.