Satara | मार्केट कमिटीला उभारी देणार – आ. जयकुमार गोरे

म्हसवड, (वार्ताहर) – म्हसवडमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ माण खटावचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी माण कृषी उत्पन्न बाजार समितीला उभारी देणार. कांदा साठवणुकीसाठी मोठी चाळ उभारणार आणि इथेच लिलाव प्रक्रिया सुरू करणार असल्याचे आ. गोरेंनी यावेळी सांगितले.
गोंदवले येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेत पेट्रोल पंपाचीही उभारणी करण्यात येईल. माण खटावच्या जनतेचा विकास डोळ्यासमोर ठेवून मी पुढे चाललो आहे. माझ्या मतदार संघातील जनता पूर्णतः सुखी झाली नसल्याने मी अजून समाधानी नाही, असे ही ते म्हणाले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलासराव देशमुख, उपसभापती वैशाली वीरकर, सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे, व्हॉइस चेअरमन मामूशेठ विरकर, डॉ.संदीप पोळ, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे माण खटाव विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे, संचालक रवींद्र तुपे, अमोल राऊत, रमेश यादव,
सचिव अमोल कट्टे, आंधळीचे सरपंच दादासाहेब काळे यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि जनसमुदाय उपस्थित होता.
यावेळी माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, आप्पासाहेब पुकळे, मामूशेठ वीरकर यांची भाषणे झाली. प्रास्ताविक रवींद्र तुपे यांनी केले. सूत्रसंचालन राहुल पाठक यांनी केले, तर आभार विलासराव देशमुख यांनी मानले.
आजपर्यंतच्या इतिहासात मार्केट कमिटी ‘ड’ वर्गात होती. तसेच नफ्यात नव्हती. मात्र सध्या ती ‘ब’ वर्गामध्ये आणून चांगल्या नफ्यात आणण्यात आम्हाला यश आले. त्यामुळे आमच्या कामाचा आम्हाला गर्व वाटतो. – विलासराव देशमुख, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती.





