Sana Khan: ‘स्वतःची कबर खणायला घ्या’; सना खानची अजब पोस्ट चर्चेत
Sana Khan: सना खानच्या व्हिडिओमुळे चाहतेही गोंधळात

Sana Khan: अभिनेत्री सना खान (Sana Khan ) हिने बॉलिवूडला रामराम केला आहे. तिने 2020 मध्ये बॉलिवूडला निरोप दिला आणि मुफ्ती अनस सय्यद याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर सना हिने तिचा संपूर्ण वेळ फक्त कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर सनाने दोन मुलांना जन्म दिला.
सना आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडिओ चर्चेत आला आहे. Sana Khan
सना खान व्हिडिओमध्ये म्हणते की, ‘तुम्हाला खरंच वाटतं का? की तुमच्या मृत्यूनंतर, तुमची मुलं, तुमचे नातेवाईक, तुमचं कुटुंब, तुमचे मित्र… तुमच्यासाठी कुराण पठण करून तुम्हाला माफ करतील? ही मुलं, जी तुम्ही सांगितल्यावर प्रार्थनासुद्धा करत नाहीत, हे नातेवाईक तुमच्यासाठी प्रार्थना करतील का?
हे मित्र, ज्यांच्यासोबत इतर चर्चा केल्यास तुमची चेष्टा करतात, ते तुमच्यासाठी सूरह फातिहा वाचतील का? हे भाऊ-बहीण, जे ईदच्या दिवशीही तुमची आठवण काढत नाहीत, ते तुमच्यासाठी दानधर्म करतील का?’ (Sana Khan )
View this post on Instagram
‘स्वतःची कबर खणायला घ्या’ (Sana Khan )
‘निष्पाप लोकांनो, प्रामाणिकपणाचं युग संपलंय. प्रलय जवळ येत आहे. सर्वत्र भ्रष्टाचाराचं वातावरण आहे. तुमची स्वतःची कबर खणायला घ्या. इथे लोक जिवंत लोकांनाच विसरतात, तर मृत्यूनंतर काय लक्षात ठेवणार?
प्रत्येकजण विसरतो. तुमच्या स्वतःच्या कबरीची, तुमच्या स्वतःच्या मृत्यूनंतरच्या आयुष्याची तयारी करा. आजच सुरुवात करा.’ सना खानच्या या व्हिडिओमुळे चाहतेही गोंधळात सापडले आहे. Sana Khan
हेही वाचा:





