नांदेडमधून भाजप आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकणार? अमित शहांच्या उपस्थितीत ‘शंखनाद’ सभा

Amit Shah | केंद्रीय मंत्री अमित शहा उद्या 26 मे रोजी नांदेड दौऱ्यावर असणार आहेत. काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री आणि राज्यातील हरितक्रांतीसह अनेक महत्त्वाकांक्षी योजनांचे जनक वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता अमित शहा नवा मोंढा, नांदेड येथे भारतीय जनता पक्षाच्या ‘शंखनाद’ जाहीर सभेला संबोधित करतील
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आदी नेते उपस्थित राहतील, अशी माहिती खासदार अशोक चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबतची माहिती देत अशोक चव्हाण म्हणाले की, अमित शहा २५ ते २७ मे दरम्यान तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नांदेड येथील ‘शंखनाद’ सभेतून ते ऑपरेशन सिंदूर, नक्षलवादाचा बिमोड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीची ११ वर्षांची पूर्तता, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यावर संबोधन करतील. जिल्ह्यासह परिसरातून किमान ५० हजार लोक येतील, असा दावा चव्हाण त्यांनी केला.
असा असेल दौरा
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 25 मे रोजी रविवारी रात्री साडेनऊला नागपूर येथे दाखल होतील. सोमवारी सकाळी जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथील भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत.
- त्याचदिवशी सोमवारी दुपारी १.१५ ला श्री गुरू गोविंदसिंगजी विमानतळावर आगमन होईल.
- दुपारी १.३० आनंदनगरातील माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या यांच्या प्रतिमेचे ते अनावरण करतील.अ
- विद्युतनगर चौकात खा.डॉ. अजित गोपछडे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करतील.
- दुपारी दोन वाजता ‘शंखनाद’ सभेला संबोधन करतील.
- सोमवारी रात्री त्यांचे मुंबईत आगमन होईल. मंगळवारी सर कावसजी जहांगीर सभागृह येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ६० व्या पुण्यतिथीनिमित्त अमित शाह यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
हेही वाचा:
“मोहम्मद युनूसने अमेरिकेला देश विकला, दहशतवाद्यांच्या मदतीने…” ; शेख हसीना यांचा गंभीर आरोप





