पत्नीला 100 तुकडे करुण फ्रीजमध्ये ठेवायची धमकी

पुणे – पत्नी व मुलांना 100 तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवायची धमकी पतीने दिली. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती सिध्दार्थन व्ही.पी (42,रा.तंजावरु, तामिळनाडू), पनीर माथोर, वडीवग्गाल व्ही.पी.(63) आणि इतर तीघांविरुध्द गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी फुरसुंगी येथे रहाणाऱ्या 34 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादीचा सिध्दार्थन बरोबर 2010 मध्ये विवाह झाला होता. यानंतर माहेरुण पैसे घेऊन ये म्हणून तीचा वारंवार छळ करण्यात येत होता. पतीबरोबर इतर सासरचेही मानसिक व शारीरीक छळ करत होते. दरम्यान पतीने तीला व मुलांना जीवे ठार मारुन तुमचे 100 तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवीन अशी धमकी दिली.
यानंतर फिर्यादीचा पती तीला व मुलांना सोडून निघुन गेला. मुलांची कोणतीच जबाबदारी त्याने घेतली नाही. घटस्फोट देण्यासाठी तो सातत्याने दबाव टाकत होता. याप्रकरणाचा तपास महिला पोलिस हवालदार बर्वे करत आहेत.




