Atul Save : OSD विरोधात त्याच्या पत्नीचे गंभीर आरोप; अतुल सावेंकडून दखल, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले…
Atul Save : या प्रकरणी मंत्री अतुल सावे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Atul Save : भाजप नेते तथा मंत्री अतुल सावे यांचे विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) विजय धुलचंद कारंडे यांच्या विरोधात पुण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्नीला बेदम मारहाण करून गळा दाबत खून करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून, या प्रकरणी कोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात हिंसाचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, मंत्र्यांच्या ओसीडीकडून घरगुती हिंसाचाराच्या घटनेने विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे.
३० एप्रिल रोजी पुण्यातील क्वीन्स गार्डन परिसरातील विजय कारंडे यांच्या निवासस्थानी ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, मोबाईलचा पासवर्ड आणि काही चॅट्सबाबत विचारणा केल्यामुळे कारंडे संतापले. त्यानंतर त्यांनी पत्नीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. या भांडणात आईला वाचवण्याचा प्रयत्न त्यांच्या मुलाने केल्याने त्याला बॅटने मारहाण केली. (Atul Save)
— Atul Save (@save_atul) May 6, 2026
पीडित महिलेने एका न्यूज वाहिनीसोबत बोलताना सांगितले की, “मी मंत्र्याचा OSD आहे, माझं कोणी काहीही बिघडवू शकत नाही,” अशी धमकी विजय कारंडेने दिली होती.
पत्नीला बेदम मारहाण केल्यामुळे त्यांच्या हातापायावर काळे निळे डाग पडले होते. विरोधकांनी या घटनेप्रकरणी संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.
अतुल सावेंची पोस्ट (Atul Save)
दरम्यान, मंत्री अतुल सावे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत सोशल मीडियावरून पोस्ट शेअर केली आहे. “विजय कारंडे विरोधात त्यांच्या पत्नीने केलेली तक्रार अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी म्हटले आहे.





