WIFA Inter-district Jr. Football C’ship 2024 | पुणे संघाची अंतिम फेरीत धडक…

WIFA Inter-district Jr. Football C’ship 2024 | एथन लोबोच्या दमदार कामगिरीच्या जोरावर धुळे येथे सुरु असलेल्या विफा आंतरजिल्हा ज्यू. फुटबॉल स्पर्धेत पुणे संघाने अहिल्यानगरला पराभूत करताना अंतिम फेरीत धडक मारली. पुणे संघासमोर अंतिम फेरीत गतविजेत्या मुंबई जिल्हा संघाचे आव्हान राहणार आहे.
अहिल्यानगरच्या भानुदास चंदने ९ व्या मिनिटाला गोल करताना आघाडी मिळवून दिली. ही आघाडी अहिल्यानगर संघाने मध्यंतरायपर्यंत टिकविली. दुसऱ्या सत्रात पुण्याच्या लेफ्ट-बॅक इथन लोबोने ५५ व्या मिनिटाला गोल करताना पुणे जिल्ह्याला बरोबरी साधून दिली. मात्र ५७ व्या मिनिटाला भानुदास चंदने पुन्हा गोल करताना अहिल्यानगरला आघाडीवर नेले.
त्यानंतर सौराजा गुप्तताने ७० व्या मिनिटाला मैदानी गोल करताना पुन्हा बरोबरी साधून दिली. एथन लोबोने ७३ व्या मिनिटाला पेनल्टी केकवर अप्रतिम गोल करताना पुणे संघाचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. दुसऱ्या बाजूने मुंबई संघाने ठाणे संघाला ५-० असे पराभूत करताना अंतिम फेरीत धडक मारली.





