Wiaan Mulder Record : शतक अन् फक्त ३१ धावांत ७ विकेट्स! ‘या’ अष्टपैलू खेळाडूने जगात आजवर कोणालाही न जमलेला केला विश्वविक्रम
Wiaan Mulder Record : दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला एक डाव आणि २१९ धावांनी पराभूत करून मालिका २-० ने जिंकली. या सामन्यात स्टार अष्टपैलू खेळाडू वियान मुल्डरने ऐतिहासिक कामगिरी केली.

Wiaan Mulder World Record Century with 7 Wickets : दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एकतर्फी वर्चस्व गाजवत अवघ्या तीन दिवसांत एक डाव आणि २१९ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या शानदार विजयासह यजमान संघाने दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० अशी खिशात घालत पाहुण्यांना क्लीन स्वीप दिला. दक्षिण आफ्रिकेच्या या महाविजयाचा खरा नायक स्टार अष्टपैलू वियान मुल्डर ठरला, ज्याने शतक आणि आठ विकेट्स घेत ऐतिहासिक विश्वविक्रम आपल्या नावे केला.
पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा ४९४ धावांचा डोंगर –
या सामन्यात बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या ९१ धावांत आटोपला, ज्यामध्ये वियान मुल्डरने एक महत्त्वपूर्ण विकेट्स घेतली होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने आपल्या पहिल्या डावात मार्क्स एकरमन आणि वियान मुल्डर यांच्या शानदार शतकांच्या जोरावर ४९४ धावा उभारून डाव घोषित केला. मुल्डरने उत्कृष्ट फलंदाजी करत १०० धावा केल्या. पहिल्या डावातील ४०३ धावांच्या मोठ्या आघाडीनंतर आफ्रिकेने बांगलादेशला दुसऱ्या डावातही अवघ्या १८४ धावांत गुंडाळले.
दुसऱ्या डावात वियान मुल्डरचा भेदक मारा –
No South African batter has scored more Test hundreds than Wiaan Mulder this decade 🇿🇦
#Cricket #SAvBAN https://t.co/Yb1gJccZhP
— Wisden (@WisdenCricket) November 25, 2026
बांगलादेशच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना वियान मुल्डरने अक्षरशः कहर केला आणि पाहुण्यांची फलंदाजी पूर्णपणे उद्ध्वस्त केली. त्याने अवघ्या ११ षटकांत तीन निर्धाव षटके टाकत फक्त ३१ धावा देऊन तब्बल ७ विकेट्स टिपले. ही त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी ठरली. दोन्ही डावांत मिळून मुल्डरने एकूण आठ गडी बाद केले. या करिश्माई कामगिरीसह त्याने जागतिक कसोटी क्रिकेटमधील एक ऐतिहासिक विक्रम स्वतःच्या नावावर केला.
‘हा’ अनोखा विश्वविक्रम करणारा जगातील पहिलाच खेळाडू –
🚨 WIAAN MULDER: 11-3-31-7 vs BANGLADESH 🥶
🏏 1st Innings Bat: 100 (178)
⚾ 1st Innings Bowl: 1/15 (6 ov)
⚾ 2nd Innings Bowl: 7/31 (11 ov)
🏆 Player of the Match https://t.co/5iITQDXUR6— Hemant Bhavsar (@hemantbhavsar86) November 25, 2026
बांगलादेशविरुद्ध एकाच डावात सात विकेट्स घेताच वियान मुल्डरने क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. आपल्या कसोटी कारकिर्दीत त्रिशतक झळकावणारा आणि एकाच डावात सात विकेट्स घेणारा तो जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी २०२५ मध्ये मुल्डरने झिम्बाब्वेविरुद्ध ऐतिहासिक त्रिशतक झळकावत नाबाद ३६७ धावांची खेळी केली होती. आजवर जगातील कोणत्याही खेळाडूला कसोटी कारकिर्दीत या दोन्ही कामगिरी एकत्र साधता आल्या नव्हत्या.





