WI vs ENG 3rd ODI Highlights : कॅरेबियन भूमीवर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळली गेलेली 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका यजमानांनी 2-1 ने जिंकली आहे. बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने पाहुण्या संघावर 8 विकेट्सने फक्त शानदार विजयच नोंदवला नाही तर मालिकेवरही कब्जा केला. ब्रँडन किंगला सामनावीराचा तर मॅथ्यू फोर्ड मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.
Carty and King hundreds ace the chase to seal West Indies a 2-1 ODI series win! 🏆https://t.co/EuDMqfuU3O | #WIvENG pic.twitter.com/AZrPiq4MVp
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 7, 2024
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून पाहुण्या इंग्लिश संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडची सुरुवात खूपच खराब झाली आणि त्यांनी 24 धावांवर चार गडी गमावले होते. विल जॅक (5), जॉर्डन कॉक्स (1), जेकब बेथेल (0) आणि कर्णधार लियाम लिव्हिंगस्टन (6) धावा करून बाद झाले. अशा संकटकाळात फिल सॉल्ट एका टोकाला क्रीजवर टीकून राहिला. त्याने सॅम करनसह डाव सांभाळला. पाचव्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांमध्ये 70 धावांची भागीदारी झाली. रोस्टन चेसने 26व्या षटकात सॅम करन (40) याला बाद करून ही भागीदारी मोडली.
यानंतर यानंतर ठराविक अंतराने विकेट पडत गेल्या आणि इंग्लिश संघाला निर्धारित 50 षटकांत आठ गडी गमावून 263 धावा करता आल्या. यादरम्यान फिलिप सॉल्टने 108 चेंडूत सर्वाधिक 74 धावा केल्या तर डॅन मौसलीने 70 चेंडूत 57 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तर जेमी ओव्हरटर्ननं 32 आणि जोफ्रा आर्चरनं नाबाद 38 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. वेस्ट इंडिजकडून मॅथ्यू फोर्डने तीन, अल्झारी जोसेफ आणि रोमॅरियो शेफर्डने प्रत्येकी दोन गडी बाद केले. रोस्टन चेसने एका फलंदाजाला बाद केले.
Border–Gavaskar Trophy 2024-25 : ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका 3-1 ने जिंकणार – रिकी पॉन्टिंग
प्रत्युत्तरात इंग्लंडच्या 264 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली. मात्र 42 धावांत त्यांनी पहिली विकेट गमावली. जेमी ओव्हरटर्नने सातव्या षटकात एविन लुईसला (19) बाद करून ही भागीदारी मोडली. यानंतर फलंदाजीला आलेल्या केसी कार्टीने ब्रँडन किंगसह डाव सांभाळला आणि झटपट धावा केल्या. या दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी 209 धावांची भागीदारी करत संघाला विजयाच्या दिशेने नेले. 41 व्या षटकात रीस टोपलीने ब्रँडन किंग याला बोल्ड करत ही भागीदारी तोडली पण तोपर्यंत ब्रँडनने आपले काम केले होते. ब्रँडन किंगने 117 चेंडूत 13 चौकार अन् 1 षटकाराहसह 102 धावा करत तर केसी कार्टीने 114 चेंडूत 15 चौकार अन् 2 षटकाराहसह नाबाद 128 धावा करत वेस्ट इंडिजला शानदार विजय मिळवून दिला आणि मालिकाही जिंकली. कर्णधार शे होप पाच धावा करून नाबाद राहिला. इंग्लंडकडून रीस टोपली आणि जेमी ओव्हरटर्न यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.