\n

या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंड संघाने सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजने 20 षटकांत 8 गडी गमावून 158 धावा केल्या होत्या. या काळात संघाचा कर्णधार रोव्हमन पॉवेल यानं सर्वात मोठी खेळी केली. त्यानं 41 चेंडूंचा सामना करताना त्याने 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 43 धावा केल्या तर रोमारियो शेफर्डने 12 चेंडूत 22 धावा केल्या. याशिवाय संघाचे इतर सर्व फलंदाज जवळपास फ्लॉप ठरले.  वेस्ट इंडिजची सुरुवात खूपच खराब झाली आणि 35 धावांवर तीन गडी गमावले होते. ब्रँडन किंग (1), एविन लुईस (8) आणि रोस्टन चेस (13) हे झटपट बाद झाले. त्यानंतर निकोलस पूरन (14), शरफान रदरफोर्ड (01) आणि गुडाकेश मोती (09) या फलंदाजांनीदेखील निराशा केली. मॅथ्यू फोर्ड (13) आणि टायरन्स हिंड्स (पाच) धावा करून नाबाद राहिले. अशाप्रकारे वेस्ट इंडिजने निर्धारित षटकात 158 धावसंख्येपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडून गोलंदाजीत साकिब महमूद, लियाम लिव्हिंगस्टन आणि डॅन मौसली यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद केले. आदिल रशीद आणि जोफ्रा आर्चरला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

\n

विजयासाठी 159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही आणि पहिल्याच षटकात फिल सॉल्टची (0) विकेट गमावली. त्याला अकील हुसेनने बाद केले. यानंतर फलंदाजीला आलेल्या कर्णधार जोस बटलरने विल जॅकसह डाव सांभाळला. या दोन्ही फलंदाजांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 128 धावांची भागीदारी झाली. रोमारियो शेफर्डने 13व्या षटकात विल जॅकला बाद करून ही भागीदारी मोडली. विल जॅकने 29 चेंडूंत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 38 धावा केल्या.

\n

त्याच षटकात शेफर्डने जोस बटलरलाही बाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. बटलरने 45 चेंडूंत 8 चौकार आणि सहा षटकारांसह 83 धावांची विजयी खेळी खेळली. या काळात त्याचा स्ट्राइक रेट 184 होता. यानंतर पुढे लियाम लिव्हिंगस्टन याने 11 चेंडूत 23 आणि जेकब बेथेल 03 धावा केल्यानंतर नाबाद राहिले आणि इंग्लंडने 14.5 षटकांत तीन विकेट्सवर 161 धावा करून सामना सात विकेट्सने खिशात घातला. कर्णधार जोस बटलरला 83 धावांच्या खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. वेस्ट इंडिजकडून रोमॅरियो शेफर्डने दोन बळी तर अकील हुसेनने एका फलंदाजाला बाद केले.

\n

IND vs SA 2nd T20 : स्टब्सने वरुणच्या मेहनतीवर फेरलं पाणी, रोमहर्षक लढतीत द.आफ्रिकेनं भारताचा 3 विकेट्सनं केला पराभव…

\n

\n

असा झाला होता पहिला सामना…..

\n

मालिकेतील पहिल्या सामन्यात फिल सॉल्टने 54 चेंडूत 103 धावा करत टी-20 क्रिकेटमधले तिसरे ऐतिहासिक शतक झळकावले होते. त्याच्या मदतीने इंग्लंडने वेस्ट इंडिजचा सलामीच्या सामन्यात आठ गडी राखून पराभव केला होता. विशेष म्हणजे फिल सॉल्टने तिन्ही शतके वेस्ट इंडिजविरुद्ध  झळकावली आहेत. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 9 गडी गमावून 182 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 16.5 षटकात 2 गडी गमावताना 183 धावा करत सहज विजय मिळवला होता.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"WI vs ENG 2nd T20I : बटलरची तुफानी खेळी, इंग्लंडचा वेस्ट इंडिजवर सलग दुसरा विजय…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/11/eng-vs-wi-1.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/wi-vs-eng-2nd-t20i-buttlers-thunderous-innings-englands-second-straight-win-over-west-indies#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/11/eng-vs-wi-1.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/wi-vs-eng-2nd-t20i-buttlers-thunderous-innings-englands-second-straight-win-over-west-indies#webpage","name":"WI vs ENG 2nd T20I : बटलरची तुफानी खेळी, इंग्लंडचा वेस्ट इंडिजवर सलग दुसरा विजय…","url":"https://www.dainikprabhat.com/wi-vs-eng-2nd-t20i-buttlers-thunderous-innings-englands-second-straight-win-over-west-indies","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/wi-vs-eng-2nd-t20i-buttlers-thunderous-innings-englands-second-straight-win-over-west-indies#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/11/eng-vs-wi-1.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/wi-vs-eng-2nd-t20i-buttlers-thunderous-innings-englands-second-straight-win-over-west-indies#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/wi-vs-eng-2nd-t20i-buttlers-thunderous-innings-englands-second-straight-win-over-west-indies","name":"WI vs ENG 2nd T20I : बटलरची तुफानी खेळी, इंग्लंडचा वेस्ट इंडिजवर सलग दुसरा विजय…"}}]}}}

WI vs ENG 2nd T20I : बटलरची तुफानी खेळी, इंग्लंडचा वेस्ट इंडिजवर सलग दुसरा विजय…