WI vs AUS : जोश हेझलवुडचा भेदक मारा! ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला तीन दिवसांत चारली धूळ

WI vs AUS Australia beat West Indies by 159 runs : वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात जोश हेझलवुडने पाच विकेट घेत ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नव्या चक्रात पहिला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाने हा सामना अवघ्या तीन दिवसांत जिंकला. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने १५९ धावांनी जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील पराभवानंतर नव्या जोमाने सुरुवात केली आहे.
एका सत्रात वेस्ट इंडिजचा डाव गुंडाळला –
जोश हेझलवुडने १२ षटकांत ४३ धावांत पाच गडी बाद करत वेस्ट इंडिजला दुसऱ्या डावात १४१ धावांत गुंडाळले. वेस्ट इंडिजसमोर ३०१ धावांचे लक्ष्य होते. परंतु वेस्ट इंडिजचा एकही फलंदाज क्रीझवर जास्त वेळ टिकू शकला नाही. अवघ्या एका सत्रात सर्व फलंदाज बाद झाले आणि ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने १८० धावा केल्या. यामध्ये सर्वाधिक धावा ट्रॅव्हिस हेडने केल्या. हेडने ५९ धावांची खेळी केली.
वेस्ट इंडिजचा पहिला डाव १९० धावांत गारद –
Australia’s #WTC27 campaign off to a winning start in Barbados 🙌#WIvAUS scorecard 📝 https://t.co/tnfgrGNZE8 pic.twitter.com/ZrZGycrtLp
— ICC (@ICC) June 28, 2025
याशिवाय उस्मान ख्वाजाने ४७ आणि पॅट कमिन्सने २८ धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडिजसाठी जायडेन सील्सने ५, शमार जोसेफने ४ आणि ग्रीव्हसने १ विकेट्स घेतल्या. दुसरीकडे, वेस्ट इंडिजने पहिल्या डावात १९० धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेजने ४४ आणि शाई होपने ४८ धावांची खेळी केली. केसी कार्टीने २० आणि ब्रॅंडन किंगने २६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने ३, हेझलवूडने २, कमिन्सने २ आणि ब्यू वेब्स्टरने २ विकेट्स घेतल्या.
पहिल्या डावात आघाडी मिळवूनही वेस्टइंडीजचा पराभव –
वेस्टइंडीजने पहिल्या डावात १० धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत ३१० धावा केल्या. यामध्ये ट्रॅव्हिस हेडने ६१, ब्यू वेब्स्टरने ६३ आणि अॅलेक्स कॅरीने ६५ धावांची खेळी साकारली. वेस्टइंडीजकडून शमार जोसेफने ५ विकेट्स घेतल्या. वेस्टइंडीजला सामना जिंकण्यासाठी ३०१ धावांची गरज होती, परंतु ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी त्यांच्या संपूर्ण संघाला १४१ धावांवर गारद करत सामना १५९ धावांनी जिंकला. शमार जोसेफने ४४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने ५ विकेट घेतल्या.





