WI vs AUS : वेस्ट इंडिजच्या गोलंदाजावर ICC ची कडक कारवाई, पॅट कमिन्सविरुद्धची ‘ती’ कृती भोवली

ICC action against Jayden Seales : वेस्टइंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बार्बाडोस येथील मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात वेस्टइंडीज संघाचा वेगवान गोलंदाज जायडेन सील्स याने आतापर्यंत गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मात्र, त्याच्यावर आयसीसीने मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर केली आहे. त्याच्यावर कारवाई का करण्यात आली? याबाबत जाणून घेऊया.
आयसीसीने जायडेन सील्सच्या सामन्याच्या मानधनात १५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच त्याच्या नावावर एक डिमेरिट पॉइंटही जोडला आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याची विकेट घेतल्यानंतर सील्सने ज्या प्रकारे आक्रमक सेलिब्रेशन केले, त्यामुळे आयसीसीने ही कारवाई केली आहे. त्याचबरोबर जायडेन सील्सने सुद्ध आपली चूक मान्य केली आहे.
सील्सने मान्य केली आपली चूक –
Jayden Seales found himself facing disciplinary action after taking Pat Cummins’ wicket on Day 1. For a gesture made towards the pavilion, the fast bowler was fined 15% of his match fee and accumulated one demerit point.
.
. #jaydenseales #patcummins #fined #ausvswi… pic.twitter.com/90vsDmASA3— Cricket Gyan (@cricketgyann) June 27, 2025
वेस्ट इंडिज संघाचा वेगवान गोलंदाज जायडेन सील्सने आयसीसीने लावलेल्या दंडाबाबत आपली चूक मान्य केली आहे. सील्सने आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल-१ नियमांचे उल्लंघन केले, ज्यामुळे त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंट जोडला गेला आहे. गेल्या २४ महिन्यांत सील्सच्या खात्यात हा दुसरा डिमेरिट पॉइंट आहे.
हेही वाचा – Pat Cummins : पॅट कमिन्सने रचला नवा इतिहास, रिची बेनॉडचा मोडला ६३ वर्षांपूर्वीचा विक्रम
यापूर्वी डिसेंबर २०२४ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यातही त्याला आयसीसीकडून ताकीद देण्यात आली होती आणि एक डिमेरिट पॉइंट जोडला गेला होता. सील्सने पहिल्या दिवसाच्या खेळानंतर दिलेल्या निवेदनात सांगितले की, पॅट कमिन्सची विकेट घेतल्यानंतर तो थोडा संतापला होता, ज्यामुळे त्याने अशी कृती केली. सील्सने आपली चूक मान्य केल्यानंतर या प्रकरणात पुढे कोणतीही औपचारिक सुनावणी होणार नाही.
हेही वाचा – Shikhar Dhawan : धवन गर्लफ्रेंडला रोहितसोबतच्या रुममध्ये कसा आणायचा? स्वत:च केला खुलासा
बारबाडोस कसोटी रोमांचक वळणावर –
बारबाडोस येथे सुरू असलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात दोन दिवसांचा खेळ पूर्ण झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १८० धावांत आटोपला, तर यजमान वेस्ट इंडिजचा डाव १९० धावांत संपला. दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ४ गडी गमावून ९२ धावा केल्या असून, त्यांना ८२ धावांची आघाडी मिळाली आहे. तिसऱ्या दिवशी निकालाची शक्यता आहे. दोन दिवसांत एकूण २४ गडी बाद झाले आहेत.





