Sharad Pawar : शरद पवारांच्या नावाची घोषणा पुन्हा राज्यसभेसाठी का करण्यात आली? ही आहेत चार मोठी कारणं वाचा सविस्तर…
Sharad Pawar : महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाची घोषणा राज्यसभेसाठी का करण्यात आली याविषयी समजून घेऊयात...

Sharad Pawar : राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून, १६ मार्चला निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातील सात खासदारांचा कार्यकाळ संपल्याने ही निवडणूक होत आहे. या जागा मिळून एकूण ३७ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. आज ५ मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपने धक्कातंत्र देत दोन नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.
महाविकास आघाडीकडून कोणाच्या नावाची घोषणा राज्यसभेसाठी करण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. अखेर सस्पेन्स संपला आणि महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठिंबा देत त्यांच्या नावाची घोषणा राज्यसभेसाठी करण्यात आली. सुरुवातीपासूनच शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तेब होणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. तरीही आघाडीत मोठा संघर्ष का झाला आणि शरद पवार यांचेच नाव अंतिम का करण्यात आले हे जाणून घेऊयात…
१ मोठ्या तणावानंतर शिक्कामोर्तेब
८५ वर्षांचे असूनही शरद पवार हे MVA चे मार्गदर्शक आणि INDIA आघाडीचे प्रमुख नेते मानले जातात. त्यांचा राजकीय अनुभव, दिल्लीतील संपर्क आणि राजकीय रणनिती तसेच कौशल्य यामुळे ते संसदेत प्रभावी आवाज म्हणून असणे आघाडीच्या हिताचे मानले जाते. त्यामुळे मोठ्या संघर्षानंतर त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तेब करण्यात आला.
२ उद्धव ठाकरेंना फोन
या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर काँग्रेस आणि उबाठा गटाने या जागेवर दावा केला होता. यामुळे आघाडीत एका जागेवरून मोठा तणाव निर्माण झाला होता. दोन्ही पक्षातील काही प्रमुख नेत्यांनी जागेबाबत दावा केला होता. मात्र, काँग्रेस हायकंमाड आणि काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून शरद पवार यांच्याबद्दल चर्चा केली.
३ ही भीती व्यक्त केली जात होती
महाविकास आघाडीची स्थापना करणाऱ्या शरद पवारांनाच डावलून इतर कोणाला राज्यसभेत पाठवल्यास मविआत एकवाक्यता नाही असा संदेश जाईल. त्यामुळे मविआचं राजकीय नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात होती.
४ ही आहे यामागची रणनिती
शरद पवार यांच्या नावावर एकमत झाले नसते तर भाजप पाचवा उमेदवार उभा करून शरद पवार गटाला कमकुवत करण्याचा किंवा आघाडीत फूट पाडण्याचा डाव खेळू शकतो, अशी चर्चा होती. त्यामुळे महाविकास आघाडीने शरद पवार यांचे नाव जाहीर केले. शरद पवार यांनी पक्षाची जबाबदारी सोडू नये, दिल्लीत सक्रिय राहावे, ही यामागची रणनिती असल्याचे बोलले जाते.
हेही वाचा : Lara Dutta : मिडल ईस्ट तणावात दुबईत अडकली लारा दत्ता; स्फोटांच्या आवाजाने घाबरली, म्हणाली…. “मी नर्व्हस आहे”






