“मे महिना का? याच वर्षी परीक्षेला बसवा!”; एनडीएमध्ये महिलांच्या सहभागावर सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश!

नवी दिल्ली : महिलांच्या एनडीए प्रवेशावरून नुकताच एक ऐतिहासिक निर्णय झाला होता. यापुढे महिलांना एनडीएमध्ये सहभागी करून घेता येणार आ. मात्र नुकतेच सरकारकडून हा सहभाग पुढील वर्षाच्या मे महिन्यात करता येणार असल्याचे म्हटले होते. त्यावरच आता सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेत मे महिना कशाला याच वर्षी परीक्षेला बसवा महिलांना परीक्षेसाठी बसावा असा आदेश सरकारला दिला आहे. या निर्णयामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे दिसत आहे.
एनडीएची प्रवेश परीक्षा वर्षातून दोन वेळा होते. त्यामध्ये मे महिन्यात पहिली, तर नोव्हेंबर महिन्यात दुसरी परीक्षा घेतली जाते. केंद्र सरकारने सांगितल्याप्रमाणे पुढील वर्षी मे महिन्यात होणाऱ्या एनडीएच्या परीक्षांना मुलींना बसता येणार होते. मात्र, “स्त्री-पुरूष समानतेच्या तत्वाला अजून वाट पाहायला लावता येणार नाही”, असे म्हणत न्यायालयाने याच वर्षी होणाऱ्या एनडीएच्या परीक्षांसाठी मुलींना बसवण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले.
“मुलींना या वर्षी नोव्हेंबर २०२१ मध्ये होणाऱ्या एनडीएच्या प्रवेश परीक्षेला बसू दिले पाहिजे. यासाठी अजून एक वर्ष वाट पाहायला लावू शकत नाही. यासाठीचे वैद्यकीय नियम तात्पुरते जाहीर करता येऊ शकतात. यासंदर्भात UPSC ने सुधारीत नोटिफिकेशन जारी करावं” असे न्यायालयाने यावेळी नमूद केले.





