का रे दुरावा.! ‘तमन्ना भाटिया-विजय वर्मा’चं ब्रेकअप? लग्नाच्या चर्चा सुरु असतानाच काय घडलं, पाहा….

Tamannaah Bhatia | Vijay Varma : बॉलीवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या लव्हस्टोरीची चर्चा नेहमीच रंगलेली असते. अनेकदा दोघे एकत्र पहायला मिळतात. आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिल्यानंतर तमन्ना आणि विजयच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. यावर्षी म्हणजेच २०२५ मध्ये हे जोडपं लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, अद्याप तमन्ना आणि विजय यांनी या चर्चांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी डिसेंबर २०२२ मध्ये डेट करायला सुरुवात केली होती. तेव्हा दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण अखेर २०२३ मध्ये तमन्ना भाटियाने एका मुलाखतीमध्ये विजयसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं होत.
दरम्यान, अश्यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. या जोडप्याने आपलं नातं संपवलं असल्याचं दिसून येत आहे. ब्रेकअपच्या बातमीनंतर तमन्ना आणि विजयने त्यांच्या इंस्टाग्रामवरून त्यांचे एकत्र फोटो देखील डिलीट केले आहेत. एवढंच नव्हे तर फोटो डिलीट झाल्यापासून त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांना वेग आला आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, विजय आणि तमन्ना यांचे काही आठवड्यांपूर्वी ब्रेकअप झाले होते परंतु दोघांनी कायमचे चांगले मित्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. तमन्ना आणि विजय दोघेही सध्या आपल्या कामावर लक्षकेंद्रित करताना दिसत आहे. ब्रेकअपवर ते सध्या मौन बाळगत आहेत.
तमन्ना भाटियाच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं झाले तर, तिने ‘स्त्री-२’ या सिनेमामध्ये आयटम सॉन्ग केलं होतं. या गाण्यासाठी तमन्नाचं कौतुक देखील झालं त्याचबरोबर तमन्ना जॉन अब्राहमच्या ‘वेद’ या सिनेमामध्येसुद्धा झळकली होती.
विजय वर्माने ‘डार्लिंग्स’, ‘मिर्झापूर २’, ‘दहाड’ आणि ‘जाने जान’ यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ३४ वर्षीय तमन्ना भाटियाने केवळ साऊथ सिनेमातच नाही तर हिंदी सिनेमांमध्येही विशेष ठसा उमटवला आहे.





