‘क्यू मराठी आणा चाहिए? कहा लिखा हुआ है’; एअरटेल गॅलरीत तरुणीचा उद्धपणा; ठाकरे गटाने दिला इशारा

Airtel Gallery Viral Video | महाराष्ट्रात अनेकदा परप्रांतीयांकडून मराठीतून बोलण्याला विरोध केला जातो. मुंबईमधून असे अनेक प्रकार समोर आले आहेत. यातच आता मुंबईच्या चारकोपमधील एअरटेलच्या गॅलरीत तक्रार करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाने मराठी बोलण्याचा आग्रह केल्यानंतर तेथील तरुणीने मराठी बोलण्यास नकार देत हुज्जत घातली.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. ‘क्यू मराठी आणा चाहिए? कहा लिखा हुआ है. हम हिंदुस्थान मैं रहते है’, असे एक तरुणी मराठी तरुणाला म्हणत असल्याचा व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
नेमकं काय घडलं?
एअरटेलच्या गॅलरीत तक्रार घेऊन गेलेल्या तरुणाने मराठी बोला, अशी विनंती केली. त्यावर ती तरुणी म्हणाली की, का मराठीत बोलू. तुम्हाला हिंदीत बोलता येत नाही का? त्यानंतर बराच गोंधळ झाला. व्हिडिओत दिसते की, तरुणी तिच्या वरिष्ठांना हा व्हिडीओ बनवतोय आणि महाराष्ट्रात मराठी आलं पाहिजे म्हणतोय, असे सांगताना दिसते. ‘मराठी का आलं पाहिजे. असं कुठे लिहिले आहे?’, असा उलट सवाल तरुणी मराठी तरुणाला करत आहे. आम्ही भारतात राहतो, भारतात कोणी कोणतीही भाषा बोलू शकतो, असेही तरुणी म्हणताना दिसते. Airtel Gallery Viral Video |
एअरटेल प्रशासनाने नोंद घेऊन कर्मचाऱ्यांना मराठी भाषेचं महत्त्व समजावून सांगावं. महाराष्ट्रात एअरटेल चे असंख्य मराठी ग्राहक आहेत ते कायम ठेवायचे असतील तर योग्य पाउलं उचला नाहीतर मुंबईत एअरटेल ची गॅलरी दिसणार नाही. इतर भाषेचा विरोध नाही पण मराठी भाषिक ८०% कर्मचारी असायलाच हवे.… pic.twitter.com/xRBO2nSzqh
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) March 11, 2025
…तर मुंबईत एअरटेलची गॅलेरी दिसणार नाही
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ठाकरेच्या शिवसेनेचे अखिल चित्रे आणि इतर पदाधिकारी एअरटेलच्या मुख्य कार्यालयात गेले. त्यांनी एअरटेलच्या गॅलरीत मराठी तरुण-तरुणी ठेवायला अडचण काय आहे? काही अडचण नाही, तर मग असं वारंवार का होतंय? आज जो प्रकार घडला, त्या गॅलरीत एकही मराठी मुलगा नव्हता. मुंबईतील एअरटेलच्या कामकाजात मराठी नाही तर मुंबईत एअरटेलची गॅलेरी नाही, असा इशारा अखिल चित्रे यांनी एअरटेलच्या अधिकाऱ्याला दिला. दरम्यान, मराठीचा मुद्दा महाराष्ट्रात तापलेला असतानाच एक व्हिडीओ समोर आल्याने अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. Airtel Gallery Viral Video |
हेही वाचा :
औरंगजेबाचे कौतुक करणाऱ्या अबू आझमींना कोर्टाकडून मोठा दिलासा; अटकेपासून मिळाले सरंक्षण, पण…





