Sambhajiraje Chatrapati : अजित पवार गप्प का ? संभाजीराजेंचा सवाल; धनंजय मुडेंना मंत्रीपदावरून हटवण्याची केली मागणी

पुणेः वाल्मिक कराड सीआयडीला शरण गेल्यानंतर राज्यात राजकीय चर्चांणा उधाण आले आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. यातच या प्रकरणी स्वराज्य पक्षाचे संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्री करू नका, त्यांना मंत्री पदावर खाली खेचणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली आहे. तसेच या विषयावर अजित पवार गप्प का आहेत, तुम्ही का बोलत नाही. मुंडे यांचे पवार संरक्षण का करत आहेत, असा सवाल त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला आहे.
कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सात आरोपींचा मोरक्या आहे. तो शरण आल्याने विषय संपत नाही. वाल्मिक कराडच्या नावावर १४ गुन्हे दाखल आहेत. यामुळे १४ गुन्हे दाखल असतानाही योग्य ती कारवाई का केली नाही? असा प्रश्न संभाजीराजेंनी उपस्थित केला आहे. त्यांनी वाल्मिक कराडला मोक्का लावला गेला पाहिजे, अशी देखील मागणी केली आहे. खंडणीच्या गुन्ह्यात कराडला अटक केली आणि उद्या तो जामीन घेऊन बाहेर येईल, हे आम्ही शांतपणे पाहणार नाही, असे देखील ते यावेळी म्हणाले.
यामुळे खुनाचा गुन्हा कसा नोंद करणार याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे. असे देखील ते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून म्हणाले. आता सरकारची जबाबदारी वाढली आहे. सीडीआर तपासला गेला पाहिजे. कराड पुण्यात होता हे तीन दिवसांपासून पुण्यात होता हे पोलिसांना कसे समजले नाही, असा सवाल करीत पोलीस प्रशासनाला देखील संभाजेराजेंनी सवाल केला आहे. यामुळे आता वाल्मिक कराडला मोक्का लावत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नसल्याचा इशारा संभाजीराजेंनी दिला आहे. वाल्मिक कराड हा सात आरोपींइतकाच हत्येसाठी जबाबदार असल्याचे ते म्हणाले.
तीन दिवस पुण्यात आणि आज……
कालच मंत्री धनजंय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटतात आणि आज कराड सरेंडर होतो. आज लगेच कराड शरण येतो. तो तीन दिवस पुण्यात होता. काय तरी गडबड आहे. याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही संभाजीराजे यांनी यावेळी बोलताना केली.





