Prajakt Mali : पवित्र रिश्ता आणि अनेक मराठी हिंदी मालिकांमध्ये काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन झालं आहे. तिने अवघ्या ३८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. अखेर तिची कॅन्सरची झुंज अपयशी ठरली आहे. आज रविवारी पहाटे चार वाजता तिच्या निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. तिच्या निधनाच्या बातमीने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. तिच्या निधनाच्या बातमी मनाला चटका लावणारी आहे. तिच्या निधनाच्या बातमीनंतर अभिनेत्री प्राजक्ता माळीने एका वाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. तिच्यासोबतच्या आठवणी सांगत प्राजक्ताने आपल्या भावनांना वाट मोकळी केली. खरंतर प्रिया मराठे हिच्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. मलाही धक्का बसलाय… कालपरवापर्यंत आमच्यात रमणारी हसणारी…. आज ती आपल्यात नाहीये हे मी अजून अजून पचवतेच आहे, असं प्राजक्ताने म्हटलं आहे. चांगली माणसं देव का नेतो? आम्ही एकत्र एकापेक्षा एक या डान्स रियालिटी शोमध्ये काम केलं आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये आम्ही एकत्र होतो. एकत्र वावरलो. ती अत्यंत गुणी मुलगी होती. अत्यंत शांत आणि अतिशय नम्र आणि सोज्यवळ आणि आपल्या कामाशी काम ठेवणारी होती. दुसऱ्याला त्रास द्यायचा नाही. कोणी काही बोललं तरी सोडून द्यायचं. त्याचा अपमान करायचा नाही, असा स्वभाव तिचा होता. गोड व्यक्तिमहत्व तिचं होतं. चांगली माणसं देव का नेतो? असा सवाल प्राजक्ताने केला. उलट त्रास व्हायला लागलाय खूप. सुदंर काम करत होती आणि मनापासून काम करायची, असं अभिनेत्री प्राजक्ता माळीने अभिनेत्री प्रिया मराठेविषय़ी बोलताना सांगितलं. अकाली जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का अभिनेत्री प्रिया मराठेचं तिच्या राहत्या घरी निधन झालं आहे. आज ३१ अॅागस्ट पहाटे चार वाजता तिच निधन झालं आहे. आज संध्याकाळी चार वाजता तिच्यावर अंतिम संस्कार होणार असल्याची माहिती आहे. तिने पवित्र रिश्ता’, ‘साथ निभाना साथियाँ’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ अशा मालिकांमधून लोकप्रियता मिळवली आहे. तिच्या अकाली जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. हेही वाचा : मराठा आरक्षणाबाबत केलेल्या ‘त्या’ विधानानंतर शरद पवार मैदानात; मनोज जरांगेंची घेणार भेट?