Prajakta Mali: “संवाद आणि शांततेवर माझा विश्वास”; दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर प्राजक्ता माळीची प्रतिक्रिया
Prajakta Mali मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्राजक्ताने कोणत्याही संघर्षातून मार्ग काढण्यासाठी संवाद आणि शांतता हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचे म्हटले आहे.

Prajakta Mali: दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. नीट पेपरफुटी प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवहारांविरोधात सुरू असलेल्या या आंदोलनात अनेक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जनंतर या विषयावर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकीय नेत्यांसोबतच चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनीही विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आवाज उठवला आहे.
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्राजक्ताने कोणत्याही संघर्षातून मार्ग काढण्यासाठी संवाद आणि शांतता हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचे म्हटले आहे. ( Prajakta Mali)
इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे प्रतिक्रिया देताना प्राजक्ता माळी म्हणाली, “आजपर्यंत माझा दोन गोष्टींवर विश्वास राहिला आहे. ते म्हणजे संवाद आणि शांतता. कोणताही वाद हा योग्य संवादातून सोडवला जाऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीला शांततेत आणि सुरक्षित वातावरणात जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे शांततेने संवाद साधून यातून मार्ग काढावा. प्रत्येक विद्यार्थ्याच्या वेदनांची मला जाणीव आहे आणि त्यांच्या भावनांशी मी जोडलेली आहे.” ( Prajakta Mali)
प्राजक्ताच्या ( Prajakta Mali) या पोस्टनंतर तिच्या भूमिकेची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी तिच्या संयमी भूमिकेचे स्वागत केले, तर काहींनी विद्यार्थ्यांना दिलेल्या पाठिंब्याचे कौतुक केले.

Prajakta Mali
या आंदोलनाला केवळ मराठीच नव्हे, तर बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनीही समर्थन दिले आहे. काही कलाकार प्रत्यक्ष जंतर-मंतरवर जाऊन विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. अभिनेत्री हुमा कुरेशी, शबाना आझमी, इमरान खान आणि गायिका चिन्मयी श्रीपदा यांसारख्या कलाकारांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. ( Prajakta Mali)
याशिवाय सलमान खान, आलिया भट्ट, फरहान अख्तर, ऋचा चड्ढा, विक्रांत मेस्सी, कोंकणा सेन शर्मा, दिया मिर्झा यांच्यासह अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी शांततेच्या मार्गाने संवाद साधून या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. ( Prajakta Mali)
मराठी अभिनेत्री छाया कदम हिनेही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. आंदोलनातील एक फोटो शेअर करत तिने लिहिले, “माझी पुढची पिढी शिक्षणासाठी रस्त्यावर उतरली आहे. माझ्या घरातदेखील विद्यार्थी आहेत. एक पालक आणि या देशाची नागरिक म्हणून माझ्या पुढच्या पिढीला आधार देणे हे माझे नैतिक कर्तव्य आहे.”
दिल्लीतील हे आंदोलन दिवसेंदिवस अधिक चर्चेत येत असून, शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर देशभरात चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती आपापली भूमिका मांडताना दिसत आहेत. प्राजक्ता माळीने मात्र कोणत्याही वादावर तोडगा काढण्यासाठी संवाद आणि शांततेलाच सर्वात महत्त्व दिले असून, विद्यार्थ्यांच्या वेदनांशी आपण भावनिकदृष्ट्या जोडलेले असल्याचे स्पष्ट केले आहे.





