मराठा आरक्षणाबाबत केलेल्या ‘त्या’ विधानानंतर शरद पवार मैदानात; मनोज जरांगेंची घेणार भेट?

Sharad Pawar meet Manoj Jarange | मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलकांनी कंबर कसली आहे. यादरम्यान, अनेक बड्या नेत्यांनी जरांगे यांची भेट घेतली.
माजी मंत्री राजेश टोपे यांनी आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी उपोषण करत असलेले मनोज जरांगे यांची शनिवारी रात्री उशिरा भेट घेतली. यानंतर आता शरद पवार देखील आज मनोज जरांगे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, राजेश टोपे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात ४० सेकंद चर्चा झाली असल्याची माहिती आहे. रात्री उशीरा राजेश टोपे हे जरांगेंची भेट घेण्यासाठी आझाद मैदानावर आले. जरांगे पाटील यांनी देखील टोपेंशी संवाद साधला. दोघांमध्ये नेमके काय बोलणे झाले ते समजू शकले नाही. मात्र, शरद पवार तुम्हाला भेटायला येतील, असा निरोप टोपेंनी दिला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. Sharad Pawar meet Manoj Jarange |
मराठा आरक्षणावर शरद पवारांचे भाष्य
दरम्यान, अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) येथील एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले होते. “तामिळनाडूत 72 टक्के आरक्षण शक्य आहे, मग महाराष्ट्रात का नाही? घटनेत बदल करून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवता येईल. प्रगतीसाठी आरक्षण हा मार्ग आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून नव्हे, तर स्वतंत्रपणे आरक्षण मिळावे, यासाठी केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा,” अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली. Sharad Pawar meet Manoj Jarange |
अजित पवारांचा टोला
शरद पवारांच्या या वक्तव्यावर अजित पवारांनी तिखट प्रतिक्रिया दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “जे सध्या सूचना करतायत, त्यांनी अनेक वर्षे सत्ता भोगली आहे. दहा वर्षे केंद्रात मंत्रिपद उपभोगले. ते आदरणीय, वंदनीय, पुजनीय आहेत, पण मला जास्त खोलात जायला लावू नका.” अजित पवारांनी शरद पवारांचे नाव घेणे टाळले असले तरी, त्यांचा इशारा स्पष्ट होता. Sharad Pawar meet Manoj Jarange |
हेही वाचा:
जे मान्य होणार नाही, त्यासाठी हट्ट कशाला? भाजपच्या ज्येष्ठ मंत्र्यांचे विधान





