Rakul Preet Singh: ‘शूर्पणखा’च का निवडली? रकुल प्रीत सिंहने सांगितलं खास कारण
Rakul Preet Singh रकुलच्या मते, इतिहासात शूर्पणखेची ओळख अनेकदा फक्त एका घटनेपुरतीच मर्यादित राहिली आहे. मात्र तिची कथा त्यापेक्षा खूप मोठी आणि वेगळी आहे.

Rakul Preet Singh: रणबीर कपूरच्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर त्यातील कलाकार, भव्य सेट आणि व्हिज्युअल इफेक्ट्सचे कौतुक होत आहे. भगवान रामाच्या भूमिकेत रणबीर कपूर, सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी, तर रावणाच्या भूमिकेत यश झळकणार आहेत. मात्र, या सर्वांमध्ये अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या शूर्पणखा या भूमिकेनेही प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. (Rakul Preet Singh)
ट्रेलरमध्ये रकुलची झलक पाहिल्यानंतर अनेकांनी तिच्या अभिनयाचे आणि लूकचे कौतुक केले. दरम्यान, एका चाहत्याने रकुलला सोशल मीडियावर खुले पत्र लिहून तिने शूर्पणखासारखी भूमिका का स्वीकारली, असा प्रश्न विचारला. या पत्रात चाहत्याने दिवाळीत प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटासाठी तिला शुभेच्छाही दिल्या होत्या. (Rakul Preet Singh)
हे पत्र रकुलपर्यंत पोहोचताच तिने तिच्या एक्स अकाउंटवर ते शेअर केले आणि त्याला मनापासून उत्तर दिले. आपल्या पोस्टमध्ये रकुलने या भूमिकेमागचे कारण स्पष्ट केले. (Rakul Preet Singh)
ती म्हणाली, “या सुंदर पत्रासाठी धन्यवाद. तुम्ही जे लिहिलं आहे, तेच खरं कारण आहे की मी शूर्पणखेची भूमिका स्वीकारली. या पात्राची गुंतागुंत आणि तिच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू मला खूप भावले.” (Rakul Preet Singh)
रकुलच्या मते, इतिहासात शूर्पणखेची ओळख अनेकदा फक्त एका घटनेपुरतीच मर्यादित राहिली आहे. मात्र तिची कथा त्यापेक्षा खूप मोठी आणि वेगळी आहे. एक अभिनेत्री म्हणून अशा भूमिका साकारायला आवडतात, ज्या प्रेक्षकांच्या विचारांना नवा दृष्टिकोन देतात आणि त्यांना वेगळा विचार करायला भाग पाडतात. (Rakul Preet Singh)
Thank you for this beautiful letter. ❤️
What made me say yes to Surpanakha was exactly what you mentioned – her complexity. History often remembers her for one moment, but there is so much more to her story. As an actor, roles that challenge perception are the most exciting. I… https://t.co/1wFWmfwNNd— Rakul Singh (@Rakulpreet) August 3, 2026
तिने पुढे लिहिले, “प्रेक्षकांनी हा चित्रपट आणि माझी भूमिका खुल्या मनाने पाहावी, अशी माझी अपेक्षा आहे. प्रत्येक पात्राची एक वेगळी बाजू असते आणि ती समजून घेण्याचा प्रयत्न व्हावा.” (Rakul Preet Singh)
रकुलच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर तिच्या भूमिकेबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. अनेक चाहत्यांनी तिच्या धाडसी निर्णयाचे कौतुक करत, शूर्पणखाची नवी मांडणी मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला ‘रामायण’ हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग यंदाच्या दिवाळीत जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात रणबीर कपूर भगवान राम, साई पल्लवी सीता, यश रावण, सनी देओल हनुमान आणि रवि दुबे लक्ष्मण यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. ट्रेलरला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर आता चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (Rakul Preet Singh)
रकुल प्रीत सिंहची शूर्पणखा ही भूमिका चित्रपटातील महत्त्वाच्या आकर्षणांपैकी एक मानली जात आहे. तिच्या भावनिक पोस्टमुळे या पात्राबद्दल प्रेक्षकांमध्ये नवा दृष्टिकोन निर्माण झाला असून, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर शूर्पणखेची कथा कशी उलगडली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Rakul Preet Singh)





