RCB vs RR : विराट कोहलीने का जोडले हात? दिनेश कार्तिकचा खुलासा; म्हणाला, ‘मी इतका मोठा नाही की…’

कोहलीने हात जोडून कार्तिकचे ऐकण्यास दिला नकार –
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीने आयपीएल २०२१ नंतर संघाचे कर्णधारपद सोडले होते. तथापि, असे असूनही, विराट कोहली अजूनही मैदानावर कर्णधाराची भूमिका बजावताना दिसतो. राजस्थानविरुद्धच्या सामन्यातही असेच काहीसे दिसून आले. सामन्यादरम्यान, विराट कोहली आरसीबी डगआउटजवळ क्षेत्ररक्षण करत होता आणि मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर आणि फलंदाजी प्रशिक्षक दिनेश कार्तिक त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून होते.
BREAKING 🚨: Dinesh Karthik asked Kohli to bowl the last over, but Kohli denied it — keeping Albie Morkel in mind.
Nice gesture by right-arm quick bowler Kohli. pic.twitter.com/eKkOCsLMcq
— kabilan (@kabilan_7777) April 24, 2025
चिन्नास्वामी स्टेडियमवरील कोरड्या खेळपट्टीवर चेंडू बदलण्याची गरज असल्याचे कोहलीला वाटले तेव्हा ही घटना घडली. त्यामुळे चेंडू फिरकी गोलंदाजांना अनुकूल ठरेल. म्हणून, कृणाल पंड्याने गोलंदाजी सुरू ठेवली. त्याने कर्णधार रजत पाटीदारला याबद्दल माहिती दिली. त्यानंतर डावखुरा फिरकी गोलंदाजाने त्याचे तिसरे षटक पूर्ण केले. यादरम्यान, दिनेश कार्तिक आणि अँडी फ्लॉवर यांनी लाँग ऑनवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या विराट कोहलीकडून सूचना मागितल्या. यादरम्यान, कोहलीने खांदे वर करून नकार दिला आणि कार्तिकचे ऐकण्यास नकार दिला. या घटनेचा चाहते सोशल मीडियावर असा अंदाज लावत आहेत की, त्या वेळी कार्तिक आणि अँडी फ्लॉवर कोहलीला एक षटक टाकण्यास सांगत होते. मात्र, विराट कोहली याला सहमत नव्हता.
हेही वाचा – KKR vs PBKS : ‘३०० धावा करणे मोठी गोष्ट नाही…’, पंजाबविरुद्धच्या सामन्यापूर्वी रिंकू सिंगचं मोठं वक्तव्य
दिनेश कार्तिकने सामन्यानंतर केला खुलासा –
“𝘐𝘵’𝘴 𝘰𝘯𝘦 𝘵𝘩𝘪𝘯𝘨 𝘵𝘰 𝘱𝘭𝘢𝘺 𝘐𝘗𝘓 𝘧𝘰𝘳 18 𝘺𝘦𝘢𝘳𝘴, 𝘪𝘵’𝘴 𝘢 𝘥𝘪𝘧𝘧𝘦𝘳𝘦𝘯𝘵 𝘵𝘩𝘪𝘯𝘨 𝘵𝘰 𝘣𝘦 𝘤𝘰𝘯𝘴𝘪𝘴𝘵𝘦𝘯𝘵 𝘧𝘰𝘳 18 𝘺𝘦𝘢𝘳𝘴, 𝘪𝘵 𝘵𝘦𝘭𝘭𝘴 𝘺𝘰𝘶 𝘢 𝘭𝘰𝘵 𝘢𝘣𝘰𝘶𝘵 𝘝𝘪𝘳𝘢𝘵.”👌
Dinesh Karthik is in awe of Virat’s cricketing brain,… pic.twitter.com/ImxYmPUcvM
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 25, 2025
सामन्यानंतर दिनेश कार्तिक म्हणाला, “विराटची भूक किती आहे, हे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. आयपीएलमध्ये १८ वर्षे खेळणे ही एक गोष्ट आहे. पण इतकी वर्षे सातत्यपूर्ण राहणे ही दुसरी गोष्ट आहे. हे तुम्हाला या व्यक्तीबद्दल सांगते. बंगळुरूमधील पहिल्या तीन सामन्यांमध्ये त्याने मला दोन गोष्टी सांगितल्या. पहिली, तो यापेक्षा चांगला विचार करू शकला असता. आणि दुसरी, चाहते त्याला खेळताना पाहण्यासाठी येथे येतात.”
हेही वाचा – MI vs LSG : ‘क्या रे हीरो, अभी आ रहा है, घर का टीम है क्या?’, रोहितने घेतली शार्दुलची शाळा, पाहा VIDEO
मी खूप लहान व्यक्ती आहे – दिनेश कार्तिक
कार्तिक पुढे म्हणाला, ‘तुम्ही पाहू शकता की त्याने ते स्पष्टपणे नाकारले. जर तो माणूस एखाद्या गोष्टीकडे लक्ष देत असेल, तो स्वतःशी जुळवून घेतो, परिस्थिती समजून घेतो, तर त्याबद्दल बोलण्यासाठी मी खूप लहान व्यक्ती आहे. तो पूर्णपणे यात चॅम्पियन आहे. त्याने संघाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. त्यामुळे त्याने सुरुवातीपासूनच सॉल्टला सोबत घेतले. त्याची देहबोली आणि एखाद्या कामासाठीची वचनबद्धता उत्कृष्ट आहे.





