ENG vs SL 1st Test : इंग्लंड-श्रीलंकेचे खेळाडू हातावर काळ्या पट्ट्या बांधून उतरले मैदानात; जाणून घ्या ‘या’मागचं कारण…

England vs Sri Lanka 1st Test : मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. ज्यामध्ये इंग्लंडचा संघ हातावर काळी पट्टी बांधून सामना खेळण्यासाठी आला आहे. श्रीलंकेच्या खेळाडूंनीही काळ्या पट्ट्या बांधल्या आहेत. या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या संघाची सुरुवात खूपच खराब झाली आणि उपाहारापर्यंत संघाने 80 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या.
यामुळे हातावर काळी पट्टी…
मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंड आणि श्रीलंकेच्या संघांनी काळ्या पट्ट्या बांधल्या आहेत. कारण अलीकडेच इंग्लंडचा दिग्गज खेळाडू ग्रॅहम थॉर्प यांचे निधन झाले आहे. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने असा निर्णय घेतला आहे. सामन्यापूर्वी ग्रॅहम थॉर्प यांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली आहे.
Not what Sri Lanka would’ve hoped for after opting to bat 😬https://t.co/1E7nBMfVBM | #ENGvSL pic.twitter.com/jONefHpPtm
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 21, 2024
श्रीलंकेचे दोन्ही सलामीचे फलंदाज अवघ्या 6 धावांवर बाद झाले. निशान मदुष्काने 4 धावा केल्या तर दुनित करुणारत्नेने केवळ 2 धावा केल्या. त्यानंतर अँजेलो मॅथ्यूजही शून्यावरच माघारी परतला. कुशल मेंडिस आणि दिनेश चंडिमल यांच्यात 34 धावांची भागीदारी पाहायला मिळाली. यानंतर मार्क वुडने कुशल मेंडिसला हॅरी ब्रूककरवी झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
PAK vs BAN 1st Test (Day 1 Stumps) : खराब सुरुवातीनंतर आयुब-शकीलने सावरला डाव; पाकच्या दिवसअखेर….
दिनेश चंडिमललाही 17 धावांवर शोएब बशीरने एलबीडब्ल्यू आऊट केले. यानंतर ख्रिस वोक्सने 10 धावांवर कामिंदू मेंडिसला आपला बळी बनवले. यानंतर धनंजय डी सिल्वा आणि प्रभात जयसूर्या यांच्यात 21 धावांची भागीदारी पाहायला मिळाली.





