Abhishek Sharma : अभिषेक आशिया कपमध्ये जिंकलेली ‘HAVAL H9’ कार भारतात चालवू शकणार नाही, नेमकं कारण काय?

काय आहे कायदेशीर अडचण?
HAVAL H9 ही कार लेफ्ट-हँड ड्राइव्ह आवृत्तीत आहे, तर भारतात केवळ राइट-हँड ड्राइव्ह वाहनांना परवानगी आहे. भारतातील रस्ता सुरक्षा आणि वाहन नोंदणी कायद्यानुसार लेफ्ट-हँड ड्राइव्ह कारची नोंदणी किंवा वापर शक्य नाही. त्यामुळे अभिषेक शर्मा याला ही कार भारतात आणता येणार नाही. त्यामुळेच त्याला भारतात ही कार चालवता येणार नाही.
कार रिप्लेसमेंटचा पर्याय?
मिळालेल्या माहितीनुसार, HAVAL कंपनी नोव्हेंबर 2025 पर्यंत भारतात राइट-हँड ड्राइव्ह आवृत्तीमध्ये ही कार लाँच करू शकते. असे झाल्यास अभिषेकला भारतात चालवण्यासाठी याच मॉडेलची राइट-हँड ड्राइव्ह कार भेट म्हणून दिली जाऊ शकते. मात्र, कंपनीकडून याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही.
हेही वाचा – IND W vs PAK W : भारताने सलग १२ व्यांदा पाकिस्तानचा उडवला धुव्वा, विश्वचषकात पाचव्यांदा चारली धूळ
HAVAL H9 ची वैशिष्ट्ये –
HAVAL H9 ही कार तिच्या आलिशान लूक आणि आधुनिक तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध आहे. 7-सीटर लेआउट असलेल्या या कारमध्ये लेदर सीट्स, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल सीट्स, अॅपल कारप्ले, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, पॅनोरॅमिक सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 6 एअरबॅग्स, पार्किंग असिस्ट आणि ABS-EBD यांसारखी अत्याधुनिक वैशिष्ट्ये आहेत. सुरक्षिततेवर विशेष भर देणारी ही कार भारतीय बाजारात टोयोटा फॉर्च्यूनरसारख्या लग्झरी कारशी स्पर्धा करू शकते.
हेही वाचा – Muneeba Ali Run Out : मुनीबा अली MCC च्या नियमांनुसार रनआऊट होती की नाही? नियम काय सांगतो? जाणून घ्या
HAVAL H9 कारची किंमत किती?
सध्या HAVAL H9 भारतीय बाजारात उपलब्ध नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात या कारची किंमत 1,42,200 सौदी रियाल (अंदाजे 33.60 लाख रुपये) आहे. भारतात लाँच झाल्यास याची एक्स-शोरूम किंमत 25 ते 30 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. अभिषेक शर्माच्या शानदार कामगिरीने भारतीय क्रिकेट चाहत्यांचे मन जिंकले असले, तरी ही कार भारतात आणण्यासाठी त्याला आणखी वाट पाहावी लागेल.





