T-20 World Cup | चहलला का वगळले? – सेहवाग
Updated On:

नवी दिल्ली – लेग स्पीन गोलंदाज यजुवेंद्र चहल याला भारताच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात स्थान का देण्यात आले नाही, असा सवाल भारताचा माजी कसोटीपटू वीरेंद्र सेहवाग याने केला आहे.
चहलला या स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघातून वगळण्याचा निर्णय मला तरी पटलेला नाही. त्याची निवड का केली गेली नाही याचे स्पष्टीकरण निवड समिती देणार का, चहल खरेतर टी-20 क्रिकेटसाठी अत्यंत उपयुक्त गोलंदाज आहे.
चहलने गेल्या दोन मोसमात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. आयपीएलसह आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांतही त्याने धावा कमी देत बळी मिळवले आहेत. मग तरीही त्याला भारतीय संघात स्थान का मिळाले नाही, अशी विचारणाही सेहवागने केली आहे.





