तुम्ही का भारताच्या नादी लागताय? छोटा पुढारी घनश्यामने पाकला दिला दम

Ghanshyam Darode : भारताचे पाकिस्तानवर कारवाई करण्याचे सत्र असून पाकचे मनसुबे हाणून पाडण्याचे भारताने ठरवले आहे. या पार्श्वभूमीवर नेते मंडळीकडून भारत करत असलेल्या धडाकेबाज कारवाईची प्रशंसा केली जात आहे. यातच आता छोटा पुढारी या नावाने ओळख निर्माण केलेला घनश्याम दरोडे याने एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत पाकवर जळमळीत टीकास्त्र डागली आहेत. आमच्या नादीला लागू नका. तुम्ही का भारताच्या नादी लागताय? भारत देशाने आणि मोदी साहेबांनी ठरवलं तर तुम्हाला तिकडं येऊन ठोकायला अर्धा तासही लागणार नाही, असे घनश्याम म्हणाला आहे. त्याने केलेल्या विधानाची जोरदार चर्चा होत आहे.
आपल्या निष्पाप लोकांचा जीव गेलाय याचं वाईट वाटतंय. पाकिस्तानला नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांची जागा दाखवली, हे खूप बरं वाटतंय, असे म्हणत त्यांची प्रशंसा केली. युद्ध झालं तरी आपण इतिहास बघितलाय. आपल्याला काही फरक पडत नाही. पाकिस्तानने सुरूवात केली होती. सिंधू खोऱ्यातील पाणी आपण दूर केलंय. पाकिस्तानने निष्पाप लोकांचा जीव घेतलाय, त्याचं मनापासून दु:ख वाटतंय. त्यांच्या धमक नसतानाही जाणून बुजून आपल्या लोकांचा जीव घेतलाय. त्याचाही बदला घेण्याचं काम आपण करत आहोत, असं घनश्याम म्हणाला आहे.
तुमच्यात तेवढी धमक नाही
मी नागरिक म्हणून मोदींना सांगतोय. पाकिस्तानला सुट्टी द्यायची नाही. त्यांच्या घरात जाऊन धडा शिकवायचा आहे. आम्ही जर तुमच्या नादी लागलो तर एकही शिल्लक राहणार नाही. मी समजूतीचा इशारा देतोय…तुम्ही कितीही वळवळ केली तरी आमच्या पुढे जाऊ शकणार नाहीत. तुमच्यात तेवढी धमक नाही. कोणीही उठतंय आणि सिंधू खोऱ्यात रक्ताचे पाट वाहतील म्हणतोय. तुम्हाला थोडफार तरी पटायला पाहिजे. बघू कोण कोणाचा श्वास रोखतोय. यांना पाणी नाही, आता अन्नधान्य बंद करायचं. रातोरात पाकिस्तान राहायचं नाही, असा इशाराच घनश्याम दरोडेने दिला आहे.





