‘जनावरांसारखं का वागताय?’ कैलाश खेर संतापले; अर्धवट कार्यक्रम सोडून पडले बाहेर

Updated On:
‘जनावरांसारखं का वागताय?’ कैलाश खेर संतापले; अर्धवट कार्यक्रम सोडून पडले बाहेर

Singer Kailash Kher Concert गायक कैलाश खेर यांच्या नुकत्याच झालेल्या एका कॉन्सर्टदरम्यान गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात कैलाश खेर यांची गाण्यांची मैफल सुरू असताना काही प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीपणामुळे गोंधळ निर्माण झाला होता.

अनेकांनी बॅरिकेड्स तोडून पुढे येत थेट स्टेजकडे धाव घेतली. काही जण तर कैलाश खेर यांच्याजवळ पोहोचण्यासाठी मंचावर चढू लागले होते. यामुळे वाद्यवृंद आणि तांत्रिक उपकरणांना धोका निर्माण झाला होता. या सर्वप्रकरणावर कैलास खेर संतापल्याचे पाहायला मिळाले.

कैलास खेर संतापले 

चाहत्यांच्या या गैरप्रकारामुळे कैलाश खेर संतापले. त्यांनी गाणं तातडीने थांबवलं आणि प्रेक्षकांना खडेबोल सुनावले. ‘आम्ही प्रेक्षकांचा आदर करतो. पण तुम्ही जनावरांसारखं का वागताय? कृपया असं करू नका, असं वागू नका. शिस्त न पाळता गैरवर्तन करत आहात जर कुणीही स्टेजवर किंवा वाद्यांच्या जवळ आले तर, आम्ही लगेच कार्यक्रम थांबवू’, असं कैलाश खेर म्हणाले. Singer Kailash Kher Concert |

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या  इतर व्हिडीओंमध्ये लोक बॅरिकेड्स ओलांडून स्टेजभोवती गर्दी करताना दिसत आहेत. या संपूर्ण प्रकारानंतर कैलाश खेर यांनी पोलिसांनी आणि सुरक्षा रक्षकांना बोलावून घेतले. तसेच त्यांना परिस्थिती हाताळण्यासाठी विनंती केली. मात्र, यावेळी सुरक्षा व्यवस्था कमी पडत असल्याने त्यांना कार्यक्रम अर्ध्यातच सोडावा लागला. Singer Kailash Kher Concert |

हेही वाचा: 

व्हायरल व्हिडिओ, मुंबई उच्च न्यायालय अन् आता परराष्ट्र मंत्रालय… ; विजय मल्ल्या अन् ललित मोदींवर सरकारचं स्पष्टीकरण

आणखी संबंधित बातम्या

पुणे | अभिनेत्याला नाही, गायकाला मोठे करा

2024-09-09 04:15:07

पुणे | अभिनेत्याला नाही, गायकाला मोठे करा

तू खुद पर यकीन कर..! 'Chandrayaan 3' निमित्त कैलाश खेरचं खास गाणं

2023-08-23 18:47:11

तू खुद पर यकीन कर..! 'Chandrayaan 3' निमित्त कैलाश खेरचं खास गाणं