कैलाश खेर यांच्या कार्यक्रमादरम्यान राडा.. कन्नड गाण्याची मागणी करत तरुणांनी फेकल्या पाण्याच्या बॉटल्स

नवी दिल्ली – बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कैलाश खेर हे त्यांच्या अनोख्या सुरांसाठी ओळखले जातात. त्यांच्याकडे असलेल्या जादूई आवाजामुळे देशभरातील लोक त्यांच्यावर मनापासून प्रेम करतात. आपल्या आवाजामुळे आणि वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे कैलाश खेर आज वेगळ्याच कारणाने प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. कर्नाटकमध्ये एका कॉन्सर्टदरम्यान कैलाश खेर यांच्यावर हल्ला झाला आहे. एका हिंदी वृत्त वाहिनीने याबाबतचे वृत्त प्रसारित केले आहे.
रविवार कैलाश खेर यांचा हंपी येथे शो सुरु होता. यादरम्यान दोन तरुणांनी त्यांच्याकडे कन्नड गाणं गाण्याची मागणी केली. तरुणांनी उद्विग्न होत थेट कैलाश खेर यांना पाण्याच्या बॉटल फेकून मारल्याचे देखील समोर आले आहे. यानंतर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी तात्काळ ऍक्शन घेत त्या तरुणांना ताब्यात घेतले.
हंपी येथे होणाऱ्या कॉन्सर्टबाबतची माहिती सिंगर कैलाश खेर यांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे प्रसारित केली होती. त्याच कार्यक्रमादरम्यान हा गोंधळ झाल्याचे समजते. यावेळी काही काळासाठी कार्यक्रमामध्ये व्यत्यय देखील आलं होता. मात्र नंतर सर्व सुरळीत झाले. नेमकं काय झालं याबाबतची सविस्तर माहिती अद्याप तरी समोर आलेली नाही.
भारत का पुरातन नगर,काल खंड को मन्दिरों और अटारियों के स्वरूप में समाहित किये,जिसका इतिहास विश्व के कौतुक को गतिमान करता आज भी #HampiMahotsav में आज @bandkailasa #KailasaLiveInConcert का शिवनाद गूँजेगा.आज भी सब राजसी शिल्प,इतिहास,कला,संगीत का मेला, @KarnatakaWorld @kkaladham pic.twitter.com/EuCkvhP17P
— Kailash Kher (@Kailashkher) January 29, 2023
भारतातील प्राचीन शहर, जेथील मंदिरांनी इतिहास जपला, ज्या इतिहासाची आजही जग प्रशंसा करते असं म्हणत आपण हंपी महोत्सवामध्ये गाणार असल्याचे कैलाश खेर यांनी सोशल मीडियावरून सांगितले होते.कैलाश खेर हे ठीक ठिकाणी आपले शोज करत असतात त्यांना ऐकण्यासाठी चाहते देखील तितक्याच मोठ्या गर्दीने जमा होतात.





