मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर $44 अब्ज मध्ये विकत घेतल्यानंतर एलोन मस्कने ट्विटरच्या जवळपास निम्म्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. एवढ्या जास्त कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे कारण कंपनीची आर्थिक स्थिती सुरळीत करण्यासाठी मस्क यांनी सांगितले आहे. इतकंच नाही तर एलोन मस्क यांनी ट्विटरची कमान हाती घेताच मायक्रो-ब्लॉगिंग साइटचे सीएफओ, सीईओ आणि पॉलिसी चीफ यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ट्विटरसोबतच अनेक मोठ्या टेक कंपन्याही कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहेत.
कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची कारणे
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑक्टोबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, या वर्षी आतापर्यंत मायक्रोसॉफ्ट, गुगल, इंटेल सारख्या मोठ्या टेक कंपन्यांनी 45 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. अनेक लहान-मोठ्या टेक कंपन्यांनीही टाळेबंदी जाहीर केली असून नवीन नोकरभरती थांबवली आहे. यामध्ये कोरोनाच्या काळात ऑनलाइन व्यवसायातून मोठी कमाई करणाऱ्या कंपन्यांचाही समावेश आहे. कंपन्यांचे म्हणणे आहे की, लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन व्यवसायामुळे त्यांनी जास्त काम केले होते, जे आता संतुलित केले जात आहे. केवळ अमेरिकन कंपन्याच नाही, तर भारतीय आयटी कंपन्याही नवीन नोकर भरण्यास टाळाटाळ करत आहेत.
टाळेबंदीचे ‘हे’ प्रमुख कारण
खरं तर, जगभरातील टेक कंपन्या आर्थिक मंदीमुळे घाबरल्या आहेत. प्रथम कोरोना लॉकडाऊन आणि आता रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत वाढत्या अनिश्चिततेमुळे टेक कंपन्यांनी नोकरभरती थांबवली आहे आणि मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. यामागचे कारण असेही सांगितले जात आहे की, रशिया-युक्रेन युद्धामुळे पुरवठा साखळीत अडचण येत आहे. कोरोनाच्या वाढत्या केसमुळे चीनमध्ये लॉकडाऊन आहे, त्यामुळे सप्लाय चेन आणि टेक कंपन्यांच्या अडचणी वाढत आहेत.
‘या’ कंपन्यांमध्ये सर्वाधिक टाळेबंदी
1. ट्विटर (Twitter)- कंपनीने जवळपास 50 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. सुमारे 3700 लोकांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.
2. नेटफ्लिक्स (Netflix) – 500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले.
3. एल अँड टी (L&T) – कंपनीने कामगारांची संख्या 5 टक्क्यांनी कमी केली आहे.
4. टेक महिंद्रा (Tech Mahindra) – हेडकॉउंट सुमारे 1.4 टक्क्यांनी कमी झाले.
5. विप्रो (Vipro) – कर्मचार्यांवर जास्त खर्च केल्यामुळे विप्रोने 6.5 टक्के कर्मचारी कमी केले.
6. स्नॅपचॅट ( Snapchat) – स्टॉकमध्ये 40 टक्के घट झाल्यामुळे 20 टक्के टाळेबंदी. 1,000 कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागतील.
7. शॉपीफाय (Shopify)- कंपनीने आपल्या 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. 1,000 हून अधिक कर्मचारी त्यांच्या नोकऱ्या गमावू शकतात.
8. मायक्रोसॉफ्ट (Microsoft) – जुलैपासून, कंपनीने कमाई कमी झाल्यामुळे आतापर्यंत 1 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.
9. इंटेल(Intel) – कंपनी 20 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी करत आहे.
10. सी-गेट (Sea Gate) – कंपनीने आपल्या 8 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची तयारी केली आहे. सुमारे 3,000 कर्मचारी त्यांच्या नोकऱ्या गमावू शकतात.
गुगलकडून एक मोठे अपडेट! आता टीव्हीवरही पाहू शकता ‘YouTube’ शॉर्ट्स !
11. लिफ्ट (Lift) – गेल्या एका महिन्यातच कंपनीने 13 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. सुमारे 700 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले.
12. स्ट्राइप (Stripe) – कंपनी 14 टक्के कर्मचारी कमी करण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे सुमारे 1,120 कर्मचारी नोकरी गमावतील.
13. ओपनडोअर(Opendoor) – कंपनी 18 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या तयारीत आहे, याचा परिणाम 550 कर्मचाऱ्यांवर होणार आहे.