\n

 

\n

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओवरुन लाडकी बहीण नक्की कोणाची असा प्रश्न उपस्थित केला आहे. व्हिडिओमध्ये ‘दादाचा वादा’, ‘अजितदादांची लाडकी बहीण योजना’, ‘माझ्या अजितदादाने पैसे पाठवले’ असे संवाद या जाहिरातींमध्ये पाहायला व ऐकायला मिळत आहेत. “महिलांच्या बँक खात्यात येणारे १५०० रुपये ही भेट नाही तर माझ्या दादाचं प्रेम आहे. महिलांच्या स्वप्नांच्या उड्डाणातील छोटा पंख आहे आणि दादा तर एकच आहे. ही दादांची लाडकी बहीण योजना आहे”,असे या जाहिरातीमध्ये सांगण्यात व लिहिण्यात आले आहे. त्यामुळे ही योजना नक्की मुख्यमंत्री शिंदेंची की उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची असा श्रेयवादाचा प्रश्न समोर येत आहे.

\n

हा व्हिडिओ अजित पवार यांच्या ऑफिशियल पेजवर माझी लाडकी बहीण योजनेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असे आहे. मात्र अजित पवारांच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री शब्द वगळण्यात आला आहे.

\n

तर दुसरीकडे साताऱ्यात याच योजनेचे बॅनर्स सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. ज्या अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरीम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहिण योजनेची घोषणा केली त्यांचाच फोटो सातारा शहरातील पोवई नाक्यावर लावण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेची जाहिरात करणाऱ्या होर्डिगवरून अजित पवार यांचा फोटो गायब असल्याचे समोर आले आहे.

\n

\"\"

\n

साताऱ्यातील पोवई नाक्यावरील महायुती सरकारकडून नुकताच एक लाडकी बहिण योजनेचे होर्डिंग लावण्यात आले आहे. या होर्डिंगवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दिसत आहे. मात्र, या होर्डिंगवर फडणवीस समर्थकांनी अजित पवार यांचा फोटो लावला नसल्याने याची चांगलीच चर्चा सद्या सर्वत्र सुरू आहे. अजित पवार यांच्या व्हिडिओवर शिंदे गटाच्या नेत्यांकडून संताप वव्यक्त केला जात आहे तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या नेत्यांकडून भाजप साताऱ्यातील बॅनरवरून टीका केली जात आहे. दरम्यान विधान सभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला श्रेयवाद थांबणार की वाढणार यामुळे येत्या विधानसभा निडवणुकीत याचे काय परिणाम दिसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
\n० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ०

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"‘लाडकी बहीण नक्की कोणाची ? देवा भाऊची…की दादांचं प्रेम…’ योजनेच्या व्हिडिओ आणि बॅनर्समुळे महायुतीत श्रेयवाद रंगला","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/09/AJIT-PAWAR-3.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/pritifulbandheeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/whose-sister-exactly-deva-bhau-ki-dadaan-prem-video-of-yojana-created-a-credulity-in-the-mahayuti#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/09/AJIT-PAWAR-3.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/whose-sister-exactly-deva-bhau-ki-dadaan-prem-video-of-yojana-created-a-credulity-in-the-mahayuti#webpage","name":"‘लाडकी बहीण नक्की कोणाची ? देवा भाऊची…की दादांचं प्रेम…’ योजनेच्या व्हिडिओ आणि बॅनर्समुळे महायुतीत श्रेयवाद रंगला","url":"https://www.dainikprabhat.com/whose-sister-exactly-deva-bhau-ki-dadaan-prem-video-of-yojana-created-a-credulity-in-the-mahayuti","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/whose-sister-exactly-deva-bhau-ki-dadaan-prem-video-of-yojana-created-a-credulity-in-the-mahayuti#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/09/AJIT-PAWAR-3.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/whose-sister-exactly-deva-bhau-ki-dadaan-prem-video-of-yojana-created-a-credulity-in-the-mahayuti#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/whose-sister-exactly-deva-bhau-ki-dadaan-prem-video-of-yojana-created-a-credulity-in-the-mahayuti","name":"‘लाडकी बहीण नक्की कोणाची ? देवा भाऊची…की दादांचं प्रेम…’ योजनेच्या व्हिडिओ आणि बॅनर्समुळे महायुतीत श्रेयवाद रंगला"}}]}}}

‘लाडकी बहीण नक्की कोणाची ? देवा भाऊची…की दादांचं प्रेम…’ योजनेच्या व्हिडिओ आणि बॅनर्समुळे महायुतीत श्रेयवाद रंगला