घाऊक प्रवासी वाहन विक्री वाढली; महिंद्रा, मारुती कंपन्यांचे शेअर तेजीत

नवी दिल्ली – दुसर्या तिमाहीत विकासदर कमी होऊन 5.5% इतका नोंदला गेला आहे. डिसेंबरअगोदर वाहन विक्री मंदावली होती. अशा परिस्थितीत डिसेंबर महिन्यात घाऊक प्रवासी वाहन विक्री बरीच वाढल्याची आकडेवारी जाहीर झाली. त्यामुळे वाहन क्षेत्रातच नाही तर एकूणच अर्थव्यवस्थेत उमेदीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
डिसेंबरमध्ये मारुती सुझुकी कंपनीची वाहन विक्री तब्बल 30 टक्क्यांनी वाढून 1,78,248 युनिट झाली आहे. गेल्या वर्षी या महिन्यात कंपनीला फक्त 1,37,551 युनिट वाहन विक्री करता आली होती. या घटनाक्रमानंतर मारुती सुझुकी कंपनीच्या शेअरच भाव 3.26 टक्क्यांनी वाढून 11,221 रुपये प्रति शेअर या पातळीवर गेला होता.
महिंद्रा कंपनीच्या शेअरचा भाव आज 2.45 टक्क्यांनी वाढून 3,080 रुपये प्रति शेअर या पातळीवर गेला. या कंपनीची डिसेंबर महिन्यातील विक्री 18 टक्क्यांनी वाढून 41,424 युनिट झाली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये या कंपनीची 35,174 वाहने विकली होती.
जे एस डब्ल्यू एमजी मोटार इंडिया कंपनीची वाहन विक्री डिसेंबर महिन्यात 55 टक्क्यांनी वाढून 7,516 युनिट झाली आहे. ऑडी इंडिया या कंपनीची डिसेंबरमधील वाहन विक्री 27% कमी होऊन 5,816 युनिट झाली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कंपनीने 7,931 वाहनांची विक्री केली होती.
डिसेंबर महिन्यात ह्युंदाई मोटार इंडिया कंपनीची वाहन विक्री 2.4 टक्क्यांनी कमी होऊन 55,078 युनिट झाली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कंपनीची 56,450 युनिट वाहन विक्री झाली होती. टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनीची डिसेंबर महिन्यातील विक्री कोणती टक्क्यांनी वाढून 29,529 युनिट झाली. जी की गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात 24,887 युनिट एवढी होती.
2024 मध्ये किया इंडिया कंपनीची वाहन विक्री सहा टक्क्यांनी वाढून 2,55038 युनिट झाली आहे. गेल्या वर्षी या कंपनीने 2,40,999 युनिट वाहन विक्री केली होती. निस्सान मोटर इंडिया कंपनीची वाहन विक्री डिसेंबर महिन्यात तब्बल 51.42 टक्क्यांनी वाढून 11,676 युनिट झाली आहे. जी की गेल्या वर्षी या महिन्यामध्ये 7,711 युनिट होती. बजाज ऑटो कंपनीची वाहन विक्री डिसेंबर महिन्यात एक टक्क्याने कमी होऊन 3,23,125 युनिट झाली आहे.





