Hyundai Price Hike : 1 डिसेंबरपासून हुंडईच्या गाड्या महागणार; किमतीत 8 हजार रुपयांपर्यंत वाढ
Hyundai Price Hike : हुंडई मोटर इंडिया 1 डिसेंबरपासून निवडक कारच्या किमतीत 8 हजार रुपयांपर्यंत वाढ करणार. मारुती आणि ऑडीनेही किंमतवाढ जाहीर केली.

Hyundai Price Hike : कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. हुंडई मोटर इंडिया कंपनीने 1 डिसेंबर 2026 पासून निवडक कारच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या माहितीनुसार, मॉडेल आणि व्हेरिएंटनुसार किमतीत 8 हजार रुपयांपर्यंत वाढ होणार आहे.
उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत कंपनीने स्वतःच्या खर्चात कपात करून वाढलेल्या खर्चाचा मोठा भार सहन केला. मात्र, आता त्यातील काही भार ग्राहकांवर टाकण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. कोणत्या गाड्यांच्या किमती किती वाढणार, याची माहिती अद्याप जाहीर केलेली नाही.
मारुती, टाटा आणि ऑडीच्या गाड्याही महागणार –
हुंडईपूर्वी मारुती सुझुकीने 22 नोव्हेंबरपासून निवडक मॉडेलच्या किमती वाढवल्या आहेत. ही सरासरी वाढ 0.31 टक्के आहे. तर ऑडी इंडियाने 1 जानेवारी 2027 पासून सर्व मॉडेलच्या किमतीत 2 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. तर टाटाने 1 डिसेंबरपासून दरवाढ जाहीर केली आहे.
त्यामुळे नवीन कार खरेदी करणाऱ्यांनी किमतीतील बदल लक्षात घेऊन खरेदीचे नियोजन करणे आवश्यक आहे.





