Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेत कोण? इच्छुकांची खासदारकीसाठी चढाओढ सुरू
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिलेल्या राज्यसभेच्या जागेचा कार्यकाळ दीड वर्ष शिल्लक

Sunetra Pawar : महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती पोटिनवडणुकीत विक्रमी मतदानाने विजय मिळवला. यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. या रिक्त जागेवर कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यादरम्यान 6 नेत्यांची नावे चर्चेत आली आहे. छगन भुजबळ आणि जय पवार यांचे नाव राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी आघाडीवर आहे. पार्थ पवार सध्या दिल्लीच्या राजकारणात सक्रीय झाले आहेत. त्यामुळे जय पवार देखील केंद्रात जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
छगन भुजबळ आणि जय पवार यांच्यासह आनंद परांजपे, अविनाश आदिक आणि विक्रम काकडे यांच्यासह अनेक नावांची चर्चा सुरू आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील या जागेसाठी प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. (Sunetra Pawar)
आढळराव पाटील २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले होते. त्यांचा शिरूर मतदारसंघातून शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे यांच्या विरोधात पराभव झाला होता. त्यानंतर आता ते राज्यसभेसाठी प्रयत्न करत आहेत. Sunetra Pawar
पक्षाने घेतलेला कोणताही निर्णय स्वीकारेन – भुजबळ
या चर्चांबाबत छगन भुजबळ म्हणाले की, “नियमांनुसार आमदार झाल्यावर राज्यसभेचा राजीनामा द्यावा लागतो. त्यानुसार सुनेत्रा पवार यांनी आपला राजीनामा दिला. राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी पक्षाच्या उमेदवाराबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यावर पक्षांतर्गत चर्चा अद्याप सुरू झालेली नाही. स्वतःहून ती जागा मागणे अनुचित ठरेल. पण पक्षाने घेतलेला कोणताही निर्णय मी स्वीकारेन,” असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिलेल्या राज्यसभेच्या जागेचा कार्यकाळ दीड वर्ष शिल्लक आहे. बारामती लोकसभेची निवडणूक पराभूत झाल्यानंतर सुनेत्रा पवार जून २०२४ मध्ये राज्यसभेत दाखल झाल्या होत्या. आता बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आहे. यानंतर आता पक्षातील युवा नेतृत्व किंवा संघटनेत दीर्घकाळ काम केलेल्या निष्ठावान चेहऱ्याला दिल्लीत पाठवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Sunetra Pawar)
हेही वाचा:
West Bengal Cabinet : पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू सरकार! ‘या’ पाच आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ






