विवेक फणसळकर यांच्यानंतर मुंबई पोलिस आयुक्तपदी कोणाची वर्णी? ‘लेडी सिंघम’चे नावही स्पर्धेत आघाडीवर

Mumbai Police Commissioner | मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर 30 एप्रिल 2025 रोजी अर्थात उद्या सेवानिवृत्त होणार आहेत. फणसळकर यांच्यानंतर मुंबईचे पुढील पोलीस आयुक्त कोण असणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. यासाठी काही नावे सध्या चर्चेत आहेत.
महाराष्ट्र पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी, सेवाज्येष्ठतेमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेले कायदेशीर आणि तांत्रिक विभागात कार्यरत असलेले संजय कुमार वर्मा, राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ची धुरा सांभाळणारे सदानंद दाते यांची नावे आयुक्तपदाच्या स्पर्धेत आहे. याशिवाय मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडेही या पदाची धुरा दिली जाऊ शकते. Mumbai Police Commissioner |
संजय कुमार वर्मा
पोलिस सेवेतील ज्येष्ठतेनुसार १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी संजय कुमार वर्मा हे आयुक्तपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. एप्रिल २०२८ मध्ये निवृत्त होणार असलेल्या वर्मा यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये काही काळासाठी पोलिस महासंचालक म्हणून काम केले होते. Mumbai Police Commissioner |
सदानंद दाते
दुसरीकडे त्यांच्याच बॅचचे असलेले आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांचेही नाव चर्चेत आहे. सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर असलेले दाते हे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख आहेत. दहशतवादी तहव्वूर राणा यांच्या प्रत्यार्पणामध्ये दाते यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय रितेश कुमार आणि विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. Mumbai Police Commissioner |
महिला अधिकारी अर्चना त्यागी
‘लेडी सिंघम’ 1993 तुकडीच्या महिला अधिकारी अर्चना त्यागी या प्रबळ दावेदार आहेत. मुंबईच्या आयुक्तपदी पहिल्या महिला अधिकारी म्हणून शासनाच्या वतीने त्यागी यांची नियुक्ती केली जाऊ शकते. पोलिस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला या महिला अधिकारी असल्याने सध्या महाराष्ट्र पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करणाऱ्या त्यागी यांना महिला म्हणून आयुक्तपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. Mumbai Police Commissioner |
विवेक फणसळकर यांनी ३० जून २०२२ मध्ये मुंबई पोलीस आयुक्तपदाची धुरा स्वीकारली होती. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या विविध इमारती आणि योजनांचा शुभारंभ पार पडला. यावेळी त्यांनी विवेक फणसळकर निवृत्त होत असले तरी त्यानंतरही त्यांना काम करायचे असल्याचे वक्तव्य केले होते.
त्यावेळी फणसळकर यांना मुदतवाढ मिळणार का? याबाबत चर्चा सुरू झाली. मात्र त्यांना मुदतवाढ न मिळाल्याने आयुक्तपदी कोण विराजमान होणार याबाबत चर्चा होत आहेत. Mumbai Police Commissioner |
हेही वाचा:
‘पंचायत’नंतर आणखी एक हलकी-फुलकी वेबसीरिज येणार प्रेक्षकांच्या भेटीस; कधी आणि कुठे पाहता येणार?





