Manoj Jarange : “कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार असणार लवकरच कळेल” – मनोज जरांगे

Maharashtra Assembly Election 2024 – मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची 31 ऑक्टोबर रोजी दलित, मुस्लिम, मराठा समीकरणाबाबत बैठक होणार आहे. समीकरणाशिवाय पर्याय नाही. ही बैठक अधिकृत असेल.
या बैठकीत काय निर्णय होईल, हे लवकरच कळेल. दिवाळीपर्यंत कुणीही आंतरवाली सराटीत येऊ नये, असे आवाहनही मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना केले आहे. 31 ऑक्टोबरची बैठक झाल्यानंतर बैठकीतील निर्णय एक दिवस उशिरा सांगणार आहे.
दुसऱ्या दिवशी दिवाळी असून आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे बैठकीतील निर्णय पाडव्याच्या दिवशी सांगितला जाईल. कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार देणार हे देखील त्याचदिवशी सांगणार असल्याचेही मनोज जरांगे म्हणाले.
माझा पाठिंबा देण्यासाठी काही लोक पैसे मागत असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला आहे. उद्याची बैठक झाल्यानंतर सर्व काही स्पष्ट होईल, असेही जरांगे यांनी सांगितले.
दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रकृती आज खालावली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंतरवाली सराटी येथे इच्छुकांची भेटीगाठी गर्दी होत आहे.
31 ऑक्टोबरला आपला निर्णय सांगणार असल्याने जरांगे यांनी म्हटले होते. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून त्यांचे दौरे देखील सुरू आहेत. सततच्या दौऱ्यांमुळे झालेले जागरण आणि दगदगीमुळे त्यांची प्रकृती खालावली आहे.
त्यांची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली आहे. सततची दगदग आणि धावपळीमुळे त्यांच्या अंगात ताप असून अशक्तपणा देखील जाणवत आहे. मनोज जरांगेंची खालावलेली प्रकृती पाहता डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा देखील सल्ला दिला आहे.
मनोज जरांगे यांनी आंतरवालीत 31 ऑक्टोबरला मराठा, मुस्लिम व दलित समीकरण जुळवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक बोलवली आहे. या बैठकीसाठी विविध धर्माचे महत्त्वाचे हेलिकॉप्टर आणि विमानाने येणार आहेत.
त्यामुळे महाराष्ट्रातील इतर मराठा समाज बांधवांनी 31 तारखेला आंतरवाली सराटीत येऊ नये, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे.





