कामगारांच्या जागा बिल्डरांना कोणी विकल्या; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचा सवाल

मुुंबई – मुंबईच्या मराठी माणसाची अवस्था काय आहे. मुंबईच्या आमच्या गिरणी कामगारांच्या जागा बिल्डरांना कोणी विकल्या असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला. आम्ही गावठाण आणि कोळीवाडा रक्षक म्हणून काम करणार आहे. मुंबईवर 25 वर्ष एक पार्टी एक परिवार राज्य करतेय. मुंबईच्या कोळीवाड्याला आराखड्यामध्ये स्थान दिले नाही. 2022 पर्यंत एकाही कोळीवाड्याचं सीमांकन झालं नाही. कोळीवाडा मध्ये दोन मजले घर बनवायचं असेल तर टेबल खालून पैसे मोजावे लागतात असा आरोप आशिष शेलार यांनी केला.
भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेच्या गडात असलेल्या वरळी कोळीवाडा मुंबई येथे मराठी कट्टा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आमदार आशिष शेलार, आमदार सुनील राणे यांनी भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. भाजप नेते आशिष शेलार यांनी आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही. भारतीय जनता पार्टी मुंबई मध्ये मराठी कट्टा हा कार्यक्रम करत आहे. मराठी माणसाच्या समस्या आम्ही जाणून घेत आहे. आमचं मुंबई मनपा निवडणुकीसाठी मराठी माणसासाठी वचन आहे की गावठाण आणि कोळीवाडा चे आम्ही रक्षक असणार आहे.
दोन मजली घर बनवायचं असल्यास टेबलाखालून पैसे मोजावे लागतात
भाजप आमदार सुनील राणे यांनी या मराठी कट्टाच्या निमित्ताने आम्ही भेटतो. मुंबई आपल्या मराठी बांधवांची आहे. मराठी लोकांमध्ये बसून चर्चा करण्याचं व्यासपीठ मराठी कट्टा आहे. मुंबई शहरामध्ये मराठीची ओळख असली पाहिजे या साठी भाजपने मराठी कट्टाची सुरुवात केलीय. काही लोक हे स्वतः ला मराठी म्हणतात. कोळीवाडा मध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला हक्काचा घर मिळाले पाहिजे, असे सुनील राणे म्हणाले.





