अॅानस्क्रीन आवडती जोडी कोणाबरोबर? अशोक सराफ यांनी नाव घेत सांगितली आठवण; त्या अभिनेत्रीच्या कामाच केलं कौतुक

Ashok Saraf | मराठी सिनेसृष्टीत महानायक म्हणून ओळख निर्माण करणारे अभिनेते म्हणजे अशोक सराफ. या कलाकारने कित्येक मराठी सिनेमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवलं. काही सिनेमांतून विचार करायला भाग पाडलं तर काही सिनेमातून आपसूक डोळ्यांत पाणी आलं. अशोक सराफ यांनी त्यांच्या आत्तापर्यंतच्या कारकीर्दीत मराठीसह अनेक हिंदी सिनेमातही काम केलं. मराठीसह हिंदी भाषिक प्रेक्षकांनीदेखील त्यांच्या कामाचं भरभरुन कौतुक केलं.
सध्या अशोक सराफ त्यांच्या अशी ही जमावा जमवी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सिनेमाच जोरदार प्रोमोशन केलं जात असून त्यांनी रेडिओ सिटी मराठीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत सिनेमावर चर्चा झालीच पण त्यासोबतच अनेक सिनेमातून काम करणाऱ्या अभिनेत्रीच्या आठवणींना उजाळही मिळाला.
त्या अभिनेत्रीच नाव दिवंगत अभिनेत्री रंजना देशमुख. रंजना यांच्यासोबत अशोक सराफ यांनी अनेक सिनेमामधून काम केलं. त्यांच्या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. या मुलाखतीत अशोक सराफ यांनी रंजना यांच्या कामाचं कौतुक केलं. तसेच रंजना देशमुख मराठी इंटस्ट्रीत यशस्वी का झाल्या, यावरही भाष्य केलं.
दिवंगत अभिनेत्री रंजना देशमुख यांनी एक डाव भुताचा’, ‘असला नवरा नको गं बाई’, ‘झुंज’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘बिनकामाचा नवरा’ अशा अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप उमटवली. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्याबरोबर त्यांनी अनेक सिनेमात काम केलं. बिनकामाचा नवरा आणि सुशिला या सिनेमातील या जोडील्या प्रेक्षकाची पसंती लाभली. अशोक सराफ यांनी मुलाखतीवेळी दिवंगत अभिनेत्री रंजना यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
ती आठवण
खरं सांगायचं, तर माझी चांगली जोडी रंजनाबरोबर जमली होती. ती एक उत्कृष्ट कलाकार होती. एखादी गोष्ट आपल्याला जमत कशी नाही, ती गोष्ट मी करणार हा तिचा ध्यास असायचा. एवढा जेव्हा तुमचा ध्यास असतो, तेव्हा तुम्ही यशस्वी होता आणि म्हणून ती यशस्वी झाली. तिचे सुरुवातीचे चित्रपट मी पाहिलेले आहेत. का केलेत, असे वाटावे असे ते चित्रपट होते. नंतर तिने खूप सुधारणा केली. तिचे आणि माझे जास्त चित्रपट आलेत. त्या वेळेला तिची आणि माझी चित्रपटात जोडी जमली होती, अशी आठवण अशोक सराफ यांनी रंजना यांच्याबद्दल सांगितली.





